नगर पुणे महामार्गावरील नारायणगव्हाणमध्ये चुंभळेश्वर महादेवाच्या डोंगरावर वृक्षप्रेमिंच्या माध्यमातून वृक्षारोपण वृक्षसंवर्धनाचा मोठा उपक्रम पार पडत असताना गावातील जि.प. प्राथ.शाळा नारायणगव्हाण , नारायणमहाराज विद्यालय, वृक्षमित्र, विविध सामाजिक संघटना ,दानशुर ,यांसह ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली दिवसेंदिवस होत झालेली वृक्षतोड, पर्यावरणाचा होणारा -हास ,जमिनिची होणारी धुप ढासाळलेला निसर्गाचा समतोल घातक ठरत असुन प्रत्येकाने वृक्षारोपन वृक्षसंवर्धन करणे हे कर्तव्य नव्हे तर आपली नैतिक जबाबदारी असुन त्यासाठी पुढच्या काळात येणारी संकटे रोखण्यासाठी पुढच्या पिढीला प्रेरणेबरोबर निसर्गाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गावामधे जंगल उभारूया जनजागृती वृक्षदिंडी महाअभियान व विद्यार्थ्यांना मोफत वृक्ष वाटप करत एक अनोखा परिवर्तनशिल उपक्रम विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडला यासाठी संजय रासकर सर,साठे सर, युवराज बढे सर,आंदींनी विषेश सहकार्य केले यावेळी गावच्या सरपंच मनिषाताई जाधव, उपसरंपच राजेश शेळके, गणेश कोहकडे सर, प्रविण मोरे,निलेश चिपाडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सर्वांचे आभार मानले भविष्यात पर्यवरणाची हानी भरून काढण्यासाठी त्याचबरोबर निसर्गाच्या रक्षणासाठी वृक्षलागवड वृक्षसंवर्धनाचे कार्य व्यापक स्वरूपात करणार असल्याचे वृक्षमित्र सचिन शेळके यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
*चौकट~ बालपणापासूनच विद्यार्थांना निसर्गरक्षाणाची आवड निर्माण केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल त्यांच्या मनामध्ये सामाजिक कार्याची भावना निर्माण व्हावी यासाठी अशा उपक्रमांमध्ये सातत्य ठेवणार~ वृक्षमित्र सचिन शेळके
0 Comments