Ticker

6/recent/ticker-posts

लोकाभिमुख उपक्रमातून नागरिकांना योजनांचा लाभ हिच महसूल सप्ताहाची फलनिष्पत्ती बुवनेश्वरी एस.



वाशिम ,दि.७ 
 महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ या सप्ताहात नागरिकांना अधिकाधिक घेता आला हिच महसूल सप्ताहाची फलनिष्पत्ती असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले.

 आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात महसूल सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. 

हा सप्ताह महसूल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यशस्वीपणे आयोजित केला त्याबद्दल त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

 कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी मिन्नु पी.एम व अपूर्वा बासूर,अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी मोहन जोशी, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,ललित वऱ्हाडे,तहसीलदार गजेंद्र मालठाणे व प्रतिक्षा तेजनकर यांची प्रमुख उपस्थित होती.

 यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्र व लाभ वितरीत
करण्यात आले.तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवानिवृत्तीचे लाभ वितरीत करण्यात आले.
     
 उपस्थित तहसीलदारांनी व उपविभागीय अधिकारी यांनी महसूल सप्ताहाअंतर्गत केलेल्या कामांच्या माहितीचे सादरीकरण केले.उपस्थित काही लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. महसूल सप्ताहाअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रीमती बुवनेश्वरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
महसूल सप्ताहाअंतर्गत महसूल शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत सहभाग नोंदवून महसूल सप्ताह नियोजनपूर्वक यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.संचालन उपजिल्हाधिकारी मोहन जोशी यांनी केले. आभार तहसीलदार राहुल वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments