अकोला महानगरपालिकेतर्फे शहरात नाल्याचे खोदकाम केले जात होते. यावेळी खोदकामादरम्यान ऐतिहासिक वस्तु आढळल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तात्काळ हे खोदकाम थांबवण्यात आले. या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहे. तत्पूर्वी या वस्तु पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महानगरपालिकेच्या पश्चिम झोन परिसरातील किल्ला चौक पासून ते पोळा चौक पर्यंत असलेल्या रस्त्यावर महानगरपालिकेच्या वतीने नाला बांधकाम खोदकाम सुरू आहे. या दरम्यान खोदकाम करताना ऐतिहासिक पुरातन काही वस्तू मिळाल्याने अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. खोदकामा दरम्यान लोखंडी पाईप आणि तलवारी दिसून आल्या आहेत. जुने शहर परिसरातील नागरिकांनी हे ऐतिहासिक वस्तू पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. खोदकाम करत असताना काही वस्तू मिळाल्याची माहिती जुने शहर पोलीसांना मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. महापालिका वतीने करण्यात येणारे खोदकामास तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. असून या ऐतिहासिक वस्तूची पाहणी महसूल प्रशासन वतीने करण्यात येणार आहे. मात्र, या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी या पुरातन ऐतिहासिक वस्तू पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर ही गर्दी पांगवण्याकरिता जुने शहर पोलीस शर्तीचे प्रयत्न करावे लागले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments