कोपरखैरणे, नवी मुंबई.
(वार्ताहर) अनंतराज गायकवाड
येत्या नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
पक्ष वाढीसाठी नवी मुंबईतील संभाजी ब्रिगेड संघटनेने कंबर कसली आहे. याचीच प्रचिती म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मा.म. देशमुख, आ. ह. साळुंखे, पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुरोगामी विचारांनी प्रेरित झालेले ज्येष्ठ विचारवंत मा. सिद्धार्थ जाधव यांनी संभाजी ब्रिगेड पक्षात नवी मुंबई जिल्हाध्यक्ष शिवश्री डॉ. मारुतीराव खुटवड यांच्या उपस्थितीत
कोपरखैरणे येथील कार्यालयात नियुक्तीपत्र स्वीकारून प्रवेश घेतला.
दलित पॅंथर चळवळीतून ओळख निर्माण करणारे सिद्धार्थ जाधव यांनी
मान्यवर काशीराम, सुश्री बहन मायावती यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांबरोबर बीएसपी पक्षाला महाराष्ट्र मध्ये उभारी देण्याचे काम केले होते, कालांतराने राष्ट्रीय अध्यक्ष समाधान नावकर यांच्या आरपीआय (पुनर्बांधणी) पक्षाचे ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कोरोना काळातील त्यांच्या निधनानंतर आता संभाजी ब्रिगेड पक्षाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच याप्रसंगी पुरोगामी विचारधारेचे शिवश्री प्रदीप घारगे यांचीही नियुक्तीपत्र प्रदान करून जिल्हासचिव पदी नियुक्ती करण्यात आली. मा. प्रदीप घारगे नवी मुंबईतील उद्योजक असून एक उत्तम वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
याप्रसंगी दलित पॅंथर चे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड, सुनिता संकपाल, सरिता खन्ना, मनीषा खैरे, अनुसया कांबळे, अमोल सातपुते, सुभाष खैरे, जनार्दन कांबळे, दादा लादे, सचिन वाघ, प्रकाश निकम, नदीम पटेल, नितीन कदम, किरण दळवी, महेश मानकर, आकाश कोचले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments