मंगरूळपीर : शहरात ता ३० रोजी दुपारी नगर परिषदेच्या वतीने मुख्य रस्त्यावरील खड्डे ठेकेदाराकडून कसेबसे बुजविण्याचे काम झाले आणि संध्याकाळी ८ वाजता कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने दुपारीच बुजविलेल्या खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या नगर परिषदेच्या निकृष्ट कामाची पोलखोल पावसाने चार तासात केली आहे. कोणी कसाही करा काम धंदा नेमका कोण करतो कमिशन साठी धंदा
याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे शासनाच्या पैशाचा चुराडा . असे काम होत असल्यामुळे पोलखोल चव्हाट्यावर आली आहे.
मंगरूळपीर शहरातील मेन रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने सदर खड्डे अनेकदा ठेकेदाराकडून बुजविण्यात आले. मात्र, बुजविलेले खड्डे पुन्हा काही तासात उखडत असल्याने ठेकेदार चांगलाच हैराण झाला आहे. पावसाळयात डांबराच्या सहाय्याने हद्दीतील खड्डे बुजविण्यात आले. मात्र ही मलमपट्टी काही तासंपूरती ठरत आहे. याला म्हणतात जखम मांडीले आणि मलम शेंडे
नगर परिषदेने शहरातील खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदाराला दिले या ठेकेदाराने एका वाहनात चुरी मिस्त्रीत डांबर आणून ता ३० रविवारी दुपारी ३ च्या दरम्यान धावाधाव करीत मेन रोडवरील खड्डे तातडीने बूजविले. मात्र, रात्री ८ वाजताच धो धो पावसाने हे खड्डे परत उखडले आहेत. व पुन्हा खड्ड्यानी डोके वर काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामाचा सुमार दर्जा उघड होत आहे.तर नगर परिषदेने शासनाच्या पैशाचा चुराडा केल्याची बोंब शहरवासीयात होत आहे.
----------------------------------------
0 Comments