Ticker

6/recent/ticker-posts

पञकारीतेमध्ये ऊल्लेखनिय कार्य करणार्‍या युवा पञकार फुलचंद भगत यांना ऊत्कृष्ट पञकारीता सन्मान

मंगरुळपीर:-पञकारीतेमध्ये जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्टामध्ये वेगळा ठसा ऊमटवणारे,आपल्या लेखणीतुन जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडुन न्याय मिळवुन देणारे युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना पञकारीतेमधल्या ऊत्कृष्ट कार्याबद्दल सम्मानचिन्ह देवून दै.महाराष्टामध्ये अल्पावधीतच नावलौकीक मिळवणार्‍या अग्रगण्य दै.सुवर्ण महाराष्ट परिवाराकडुन गौरव करण्यात आला आहे.
          समाजपयोगी व जनसामान्यांना अग्रस्थानी ठेवून आपल्या लेखणीच्या माध्यमातुन सर्वसामान्यांचे विविध प्रश्न,समस्या शासनदरबारी पोहचुन न्याय मिळवून देणारे,परिसरात घडणार्‍या घटना घडामोडीचे जलद वार्तांकन करणारे युवा पञकार तथा सामाजीक कार्यातुन वेगळा ठसा ऊमटवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळख असणारे फुलचंद भगत यांना यंदाचा ऊत्कृष्ट आणी पञकारीतेमधील अतुलनिय कार्याचा गौरव म्हणून दै.सुवर्ण महाराष्ट परिवाराकडुन पुरस्कार देण्यात आला आहे.फुलचंद भगत यांना याआधीही पञकारीता आणी सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.गोरगरीब लोकांच्या हितासाठी सतत आपली लेखणी झिजवुन जनसामान्यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांना वाचा फोडुन त्यांना तत्परतेने न्याय देण्यासाठी नेहमी झटत असणार्‍या भगत यांना पञकारितेमधिल पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातुन कौतुक आणी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.शासन प्रशासन तसेच जनता यामधील दुवा बनुन व विविध शासकिय योजना गरजु व पाञ लाभार्थ्यापर्यत पोहचवण्यासाठी मदत करणे,शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी आदी घटकांना न्याय मिळवुन देण्यात भगत यांचा नेहमी पुढाकार घेत असतात.

Post a Comment

0 Comments