Ticker

6/recent/ticker-posts

पालावरची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये.बाल हक्काचे संरक्षण करा... अश्विनीताई..

मंगरूळपीर तालुक्यातील जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्ष अश्विनीताई राम अवताडे  ह्या समाजामध्ये वावरत असताना अनेक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. त्यातलाच एक भाग म्हणून पालावर असणाऱ्या मुलांकडे लक्ष गेले आणि त्यांना शिक्षणाबरोबर बाल संरक्षण गरजेचे असल्याने त्यांनी पालावरच शाळा भरवली व मुलांना लिहायला बोलायला शिकविले.
गेल्या अनेक वर्षापासून पोट भरण्यासाठी आलेले अनेक लोक खेड्यापाड्यात जाऊन आपापल्या परीने जो हातात व्यवसाय पडेल ते करत असताना पोट भरण्याऐवजी दुसरे कुठलेही काम त्यांच्या हातून होत नसल्यामुळे त्यांची मुलं शिक्षणापासून कोसो दूर होती परंतु अश्विनीताई अवताडे यांनी त्या लोकांशी संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन पोट भरण्याबरोबर मुलांची बौद्धिक मशागत सुद्धा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी पालावरच त्या निरागस बालकांची शाळा भरवली व त्यांना पाटीवर रेघोट्या मारून अक्षराचे वळण सुद्धा दिलं आजची मुलं चांगल्या प्रकारे लिहितात व बोलतात त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांचा उत्साह सुद्धा वाढला.
पोट भरण्यासाठी या गावातून त्या गावात जाणारे व्यवसाय निमित्त फिरणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील मुली-मुलांना एका ठिकाणी शाळेत टाका व त्यांना संरक्षण देऊन त्यांची काळजी घ्या असे आव्हान अश्विनीताई औताडे यांनी  केले. .
वाशिम मंगरूळपीर मध्ये गेले दोन ते तीन वर्षे झाले या मुला मुलींना शिक्षणा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्या साठी अश्विनीताई काम करत आहेत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तासनतास पालावर जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून त्या मुलांना शिकवुण व त्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन करणं आणि याच माध्यमातून या वर्षी पालावरच्या  १७ ते १८ मुला मुलींची ऍडमिशन शाळेत केली त्यांचे आई वडील तयार झाले त्यांना शाळेत एका ठिकाणी
 टाकण्यासाठी मागच्या वर्षी पण काही मुलांनी ऍडमिशन केली होती पण ते काही मोजकेच होते. पण यावर्षी खूप बदल झाला.  सुरुवातीला येथील लोक व मुल ऐकत नव्हते आणि जसा पाहिजे तसा प्रतिसाद पण देत नव्हते पण रोज तिथे जाऊन त्यांच्या सोबत बसून चर्चा केल्यानंतर  या लोकांमध्ये अनेक समस्या आहेत हे लक्षात आले त्याच्या मध्ये अशिक्षितपणा आणि अंधश्रद्धा ही खूप मोठी समस्या आहे ह्याच गोष्टी जाणून तिथे त्यांचं समुपदेशन केले , सोबतच बालविवाह  होऊ नये या संदर्भात जनजागृती करून बालविवाहाचे दुष्परिणाम सांगितले तसेच महिलांना आरोग्याचे मार्गदर्शन करून आपली आरोग्याची काळजी कशी घ्यायची या विषयी जनजागृती केली  त्यांच्या साठी वेळो वेळी आरोग्य शिबिर तिथे पालावर घेतले जातात या साठी आरोग्य विभाग मदत करते त्या सोबतच येथील महिलांना रोजगार विषयी मार्गदर्शन करण्यात येते. पालावर राहणाऱ्या मुलां मध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण खूप आहे कारण तिथे मोठी माणसे व्यसन करतात त्यामुळे लहान सगळेच मुले तिथे तंबाखू व पुड्या खातात या साठी त्यांचा रोज समुपदेशन केल की पुड्या व तंबाखू खाऊन आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात हळूहळू त्यांचं हे व्यसनाचे प्रमाण कमी झालं आज येथील सगळीच मुलं सकाळी तयारी करून शाळेत मोठ्या आनंदाने जातात कारण त्यांच्या मनात शिक्षणा विषयी आवड निर्माण झाली काही झालं तरी आम्ही आता शिक्षण सोडणार नाही असे ते मोठ्या उत्साहाने सांगतात. या मधील काही छोट्या मुलांची ॲडमिशन त्यांच्या आई-वडिलांनी तर पैसे भरून कॉन्व्हेंट मध्ये सुद्धा केली आणि त्यांच्या साठी ते इथेच राहण्या साठी तयार झाले एका ठिकाणी. सुरुवातीला ही मुलं ऐकत नव्हती कारण त्यांच्या मनात शिक्षणाचे विषयी उदासीनता होती,  हे करत असताना इतर ही खूप अडचणी आल्या तरी पण शिक्षणा विषयी समुपदेशन करणं सोडले नाही रोज तिथे जाऊन तासंनतास त्यांच्या जवळ बसून त्यांच्या सोबत चर्चा करून त्यांचा विश्वास बसला  संपादन केला व वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन केले हळूहळू सगळ्या महिला,पुरुष व लहान मुलं ऐकू लागले कारण कोणाची मानसिकता बदलवणे एवढे सोपे नाही त्या साठी वर्षानुवर्षे लागली असे परंतु समाज सेवा अंगी भिडल्यानेअश्विनीताई अवताडे यांनी सातत्य व परिश्रमाची जोड घालून यशस्वी लढा लढण्यासाठी तत्पर असतात.

Post a Comment

0 Comments