कारंजा ( प्रतिनिधी संजय कडोळे): पश्चिम विदर्भ हा प्रांत कापूस पिकाचा पट्टा म्हणून ओळखल्या जात असल्याने,या भागाला विविध बाजारपेठेला जोडण्याकरीता,व्यापारी इंग्रज राजवटीने त्याकाळी अमरावती-अकोला-यवतमाळ जिल्ह्यांना जोडणारी,मुर्तिजापूर - कारंजा दारव्हा मार्गे यवतमाळ आणि मुर्तिजापूर दर्यापूर मार्गे अचलपूर ह्या रेल्वेमार्गाचे निर्माण करून,शेतकऱ्याच्या शेतमालाची विशेषतः पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,कापूस या पिकाची वाहतूक करण्याकरीता मालगाडी आणि प्रवाशी वाहतूकी करीता पॅसेंजर रेल्वे सुरू केल्या होत्या.हीच पॅसेंजर पुढे "शंकुतला-रेल्वे" म्हणून ओळखल्या जावू लागली. त्याकाळी मुर्तिजापूर येथून सकाळी 06:00 ला आणि सायंकाळी 05:00 वाजता, यवतमाळ करीता एक रेल्वे गाडी आणि अचलपूर करीता एक रेल्वे गाडी सुटायची आणि त्याचवेळी यवतमाळ वरून एक आणि अचलपूर वरून एक रेल्वेगाडी परत मुर्तिजापूर येथे येत असे. खेड्यापाड्यातील कष्टकरी ग्रामस्थांचा आणि शाळकरी मुलांचा प्रवास या शंकुतला रेल्वेने सुलभ होत असे.परंतु काही वर्षापूर्वी
रेल्वे प्रशासनाने ही शकुंतला १००% बंद केली. यामुळे अनेकवेळा नागरिकांनी कित्येकदा आंदोलने सुद्धा केली. परंतु रेल्वे प्रशासन,निरनिराळे नवनविन रेल्वेमार्ग,बुलेट रेल्वे, मेट्रो रेल्वे सुरू करीत असतांना मात्र पश्चिम विदर्भावर विशेषतः अमरावती-अकोला-आजचा वाशिम-आणि यवतमाळ जिल्ह्यातून जाणार शंकुतला रेल्वे मार्ग सुरु करण्याबद्दल रेल्वे प्रशासन चकार शब्दही बोलायला तयार नाही.ही सत्य परिस्थिती आहे. मात्र यंदाच्या पावसाळी अधिवेशनात,मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचे,भाजपाचे आमदार हरिश पिंपळे यांनी यवतमाळ-मुर्तिजापूर -शंकुतला रेल्वे मार्गाचा लक्ष्यवेधी प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करून,कौशल्यपूर्ण अभ्यासाअंती सभागृहास पटवून दिला आहे. त्याबद्दल आमदार हरिश पिंपळे यांचे कारंजा येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त,दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी अभिनंदन केले असून आभार मानले आहे.तसेच कमितकमी यावेळी शंकुतला रेल्वेमार्गाचा प्रश्न सभागृहात मांडल्या गेला त्याबद्दल समाधानही व्यक्त केले आहे.तसेच आता अकोला-अमरावती-वाशिम-यवतमाळ या चारही जिल्ह्यातील सर्वपक्षिय खासदार-आमदार यांनी आमदार हरिश पिंपळे यांच्या मतांशी सहमत होऊन, रेल्वेमंत्री,केन्द्रशासन व रेल्वेप्रशासनानेपश्चिम विदर्भातील प्रवासी नागरिकांची गरज व लोकभावना लक्षात घेऊन,शक्य तेवढ्या लवकर हे रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे.
0 Comments