Ticker

6/recent/ticker-posts

रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून देताना ,रुख्मणी दीदी


रक्षाबंधन हे परम रक्षकाच्या स्नेहाचे सूचक आहे.धकाधकीच्या जीवनात मनाची स्थिती ही संस्कारातून मिळत असते. यासाठी ईश्वरीय ज्ञानाचा उपयोग करायचा असतो. कलियुगाचे आणि सत्ययुगाचेही निर्माते आपणच असणार आहोत. आपण काम, क्रोध, द्वेष, अहंकार या विचारांना सतत बाळगण्याचे काम करतो त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात.


 त्याऐवजी आपण सर्वांप्रती सदिच्छा व्यक्त केल्या आणि त्या दृष्टीने काम केले तर सत्ययुगाची निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी दिला रक्षाबंधन म्हणजे काय . राजयोग, ज्ञान, आध्यात्म हे आपल्याला मनाचे विज्ञान आपण समजून घ्यावे . सकारात्मक विचार माणसाचे आयुष्य बदलवू शकते. घरातील ऊर्जा घराची दिशा बदलवू शकते. आपले शब्द मनाची स्थिती भक्कम करू शकते. यामुळे प्रत्येक शब्द जपून वापरला पाहिजे. शब्दातून संस्कार घडत असतात. दुसऱ्यांप्रती मनात कायम सदभावना असल्या तर समोरच्या व्यक्तीपर्यंत ते विचार पोहोचतात. त्यातून बहिण भावाचे नाते मैत्रीपूर्ण होतात, असे त्या म्हणाल्या. आपल्याकडे सतत उणीव आणि नकारात्मक विचार असतील तर आपल्याला तेच परत मिळेल. त्यामुळे सदैव सकारात्मक विचार केले पाहिजे, असे त्यांनी रक्षाबंधन या निमित्ताने सांगितले.यावेळी ओम शांती परिवारातील आदरणीय  रुख्मणी दीदी अकोला व वाशिम जिल्ह्यातील. बी.के.सुमन दीदी 

 


ओम शांती परिवारातील मंगरूळपीर केंद्राच्या संचालिका सारिका दीदी,  यांनी रुख्मणी दीदी ,सुमन दीदीचे स्वागत केले.  

आणि बी.के.  दीदी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. या रक्षाबंधन कार्यक्रमात मंगरूळनाथ शहरातील दादा व बहिणींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती . आदरणीय दीदीने सर्वांना राखी बांधून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments