Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर शासकिय ध्वजारोहण सोहळा तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न !

      

भारतीय लोकशाहीच्या 76 व्या स्वातंत्र्य दिन वर्धापन दिनानिमित्त, दरवर्षी प्रमाणे,दि.15 ऑगष्ट रोजी सकाळी 09: 05 वाजता, मंगरूळपीर तालुक्यातील प्रमुख शासकिय ध्वजारोहण तथा ध्वजवंदनाचा कार्यक्रम मंगरूळपीर तहसिल कार्यालयाचे प्रांगणात पार पडला. यावेळी संपन्न झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंगरूळपीर महसूलचे उपविभागीय अधिकारी सखारामजी मुळे उपविभागीय अधिकारी सखारामजी मुळे हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये   निवासी नायब तहसिलदार रवि राठोड,
, महसूलचे नायब तहसिलदार श्री राजेश ढोंबळे, निवडणूक नायब तहसिलदार श्री आर. एम. बोंडे
मंगरूळपीर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुधाकर आळे, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक वीरेंद्रसिंह ठाकूर,
माजी नायब तहसीलदार चौधरी , माजी नगरसेवक अनिल गावंडे,
 इत्यादी हजर होते.सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी सखारामजी मुळे यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन, राष्टगीत व राज्यगीताचे सामुहिक गायन करण्यात येऊन भारतमातेचा जयजयकार करण्यात आला. 
नवनिर्वांची ११ कोतवाल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 

ध्वजारोहण कार्यक्रमाला शहरातील जिल्हा परिषद  महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थीनी, प्रतिष्ठित मान्यवर, सर्वच राजकिय पक्ष व संस्थाचे प्रतिनिधी, माजी सैनिक, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक नंदलाल पवार सर,
वराळे गुरुजी, डॉक्टर सुधाकर शिरसागर, राजकुमार ठाकूर, अशोक राऊत, अमोल रघुवंशी, शरद येवले, राजेश दबडे, सुनील भगत, फुलचंद भगत, विनोद डेरे , इरफान शेख, बाळासाहेब काळे, प्रशांत तायडे, संदीप कांबळे, रंजीत भगत, संपादक रमेश मुंजे, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते वनमालाताई पेंढारकर, शारदाताई पाटील, विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या प्रसंगी मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी मंगरूळपीर तालुक्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या स्नेहमय शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसीलदार राठोड यांनी तर आभार प्रदर्शन ढोबळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments