Ticker

6/recent/ticker-posts

कामगार नाका वाशी येथे शिवसेना कामगार सेनेच्या वतीने आण्णा भाऊ साठे जयंती साजरी.

दि : 01-08-23, सोमवार 
वाशी, नवी मुंबई. 
(वार्ताहर ) अनंतराज गायकवाड 

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती आज शिवसेना कामगार सेनेच्या वतीने  वाशी कामगार नाका येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कामगार सेनेचे नवी मुंबई प्रमुख कामगार नेते प्रदिप बी.वाघमारे उपस्थित होते.  

यावेळी प्रदिप बी.वाघमारे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना कामगार नेते प्रदिप बी.वाघमारे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक,राजकीय,सामाजिक प्रवासाबद्दल  मार्गदर्शन केले व अण्णाभाऊ साठे हे आद्य कामगार नेते असून त्यांनी कामगार चळवळीस कशा प्रकारे मोलाचे योगदान दिले यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नवी मुंबई  जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बाबूशेठ पाटील , युवा संस्थेचे जयसिंग रणदिवे,सतीश लोंढे,शांता खोत,अजय गायकवाड उपस्थित होते.जयंती उत्सवाचे आयोजन नाका प्रमुख  राजु घोडे , खजिनदार राजेश पारवे,राहुल तांबे ,अनिल रनबावळे ,अशोक चव्हाण ,कृष्णा घाटोळे 
,नामदेव घोडे यानी केले होते. जयंती उत्सवास नाका कामगार मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

Post a Comment

0 Comments