महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी/अंमलदार यांचेवरील बंदोबस्त व इतर ताण कमी व्हावा यासाठी गृहरक्षक दलाचे होमगार्ड महत्वाची भूमिका बजावत असतात. पोलीस प्रशासनाचा अविभाज्य भाग असलेल्या गृहरक्षक दलावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे अविभाज्य अंग असलेल्या होमगार्ड जवानांच्या कठीण काळात त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी गृह विभाग खंबीरपणे उभे आहे. याचा परीचय दि.२९.०८.२०२३ रोजी मा.महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या प्रयत्नांमुळे दिसून आला.
वाशिम जिल्ह्यातील जिल्हा समादेशक कार्यालय, होमगार्ड वाशिम कार्यालयाच्या पटावर मानोरा पथकामध्ये कार्यरत असलेले दिवंगत प्रेमसिंग तारासिंग चव्हाण, स.क्र.५८० यांचा दि.२१.०२.२०२३ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. दिवंगत प्रेमसिंग तारासिंग चव्हाण हे कुटुंबातील कर्ते कमावते होते व त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मयत होमगार्ड चव्हाण यांचे एच.डी.एफ.सी. बँकेत खाते असल्याने बँकेकडून त्यांना ५० लाखांचा अपघात विमा मयत होमगार्ड चव्हाण यांचे एच.डी.एफ.सी. बँकेत खाते असल्याने बँकेकडून त्यांना ५० लाखांचा अपघात विमा
अनुज्ञेय होता. दिवंगत होमगार्ड प्रेमसिंग तारासिंग चव्हाण हे अपघाती मयत झाल्यामुळे बँकेकडून त्यांच्या कुटुंबियांना अपघाती विमा मंजूर होऊन आर्थिक मदत मिळावी यासाठी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांनी प्रस्ताव तयार करून मा.समादेशक यांना सादर केला.
सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने मा.समादेशक डॉ.भूषण कुमार उपाध्याय व मा.उपसमादेशक श्री.प्रभात कुमार यांनी पाठपुरावा करून मदत मिळण्यासाठी परिश्रम घेतले.
सदर प्रस्तावाचा वेळोवेळी पाठपुरावा केल्याने दिवंगत प्रेमसिंग तारासिंग चव्हाण, स.क्र.५८० पथक मानोरा यांच्या वारसदारांना दि.२९.०८.२०२३ रोजी ५० लाखांचा धनादेश मा.समादेशक डॉ.भूषण कुमार उपाध्याय व मा.उपसमादेशक श्री.प्रभात कुमार यांच्याहस्ते होमगार्ड मुख्यालय, मुंबई येथे वितरीत करण्यात आला आहे. होमगार्डसाठीच्या विमा योजनेअंतर्गत या वर्षभरात तब्बल १.७५ कोटींची मदत करण्यात आली आहे.
0 Comments