Ticker

6/recent/ticker-posts

‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी सायकल रॅली संपन्न ; पोलीस अधिकारी/अंमलदारांसह नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाशिम पोलीस दलामार्फत वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमाअंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ‘सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र शासनाच्या सूचनेनुसार दि.०९ ऑगस्ट, २०२३ पासून राज्यभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पंचप्रण शपथ व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
त्या पार्श्वभूमीवर दि.२२.०८.२०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथून मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून सदर सायकल रॅलीस सुरुवात करण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी/अंमलदार, नागरिक व श्री बाकलीवाल विद्यालय, वाशिमचे NCC कॅडेट विद्यार्थी असे एकूण ८० पेक्षा जास्त जणांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ च्या घोषणांनी वाशिम शहर दुमदुमले होते. यावेळी ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचे आकर्षक बॅनर व नागरिक व विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषवाक्यांनी शहरातील नागरिकाचे लक्ष वेधून घेतले होते.

      (जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम.

Post a Comment

0 Comments