Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाड ; १७.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त.


नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात. अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने दि.०९.०८.२०२३ रोजी रात्री परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते यांना रात्र गस्त पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मालेगाव शहरातील एक इसम महिंद्रा सुप्रो चारचाकी वाहन क्र.MH37T2404 या वाहनाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्याच्या हेतूने वाहतूक करत असतांना आढळला. सदर वाहनाची व गोडावूनची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असलेला अं.किं.१३,२५,३६०/- रुपयांचा गुटख्याचा मुद्देमाल मिळून आला. सदर धाडीमध्ये आरोपीकडून महिंद्रा सुप्रो चारचाकी वाहन क्र.MH37T2404 अं.किं.४ लाख रुपये व सुगंधित तंबाखू व गुटखा अं.किं. १३,२५,३६०/-रु. असा एकूण १७,२५,३६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींवर पो.स्टे.मालेगाव येथे कलम १८८, २७२, २७३, ३२८ भादंवि सहकलम ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

     सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांचे मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते यांचे पथक पोहेकॉ.प्रेमदास हनमुल, पोशि.अंकुश यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावीत्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.


         *(जनसंपर्क अधिकारी)*
पोलीस अधीक्षक कार्यालय,वाशिम.

Post a Comment

0 Comments