Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथे महसूल सप्ताहांतर्गत 'एक हात मदतीचा' उपक्रम संपन्न !

 कारंजा ( प्रतिनिधी संजय कडोळे): 

कारंजा तहसिल कार्यालयाच्या वतीने,गुरुवार दि . 3 ऑगष्ट रोजी,कार्यालय सभागृहामध्ये, 'एक हात मदतीचा' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून,कारंजा महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तथा कारंजा तहसिल कार्यालयाचे तहसिलदार कुणाल झाल्टे उपस्थित होते. 'एक हात मदतीचा' कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या सामुहिक सहकार्यामधून, नुकत्याच अतिवृष्टीने झालेल्या पूरग्रस्त भागातील, गरजू,अतिशय गरीब कुटूंबियांना अन्नधान्य आणि जिवनावश्यक वस्तूच्या किटचे आणि आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सुद्धा,लोकसहभागामधून खताच्या बॅगाचे वाटप, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आणि तहसिलदार कुणाल झाल्टे यांच्या हस्ते करण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाबद्दल लाभार्थ्यांसह उपस्थितांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments