Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा नगरीतील हृदयस्थान ठरणाऱ्या वनपर्यटन (प्राणवायू निर्मिती)केन्द्राचे, "स्व. प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र कारंजा." म्हणून स्वातंत्र्य दिनी नामकरण !

कारंजा (लाड) 
( प्रतिनिधी संजय कडोळे) 
: कारंजा येथील वन विभागाच्या निसर्ग पर्यटन केंद्राचे नामकरण सहकार मंत्री ना.दिलीप वळसे - पाटील यांनी आज 15 ऑगस्ट रोजी,स्व. प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केन्द्र कारंजा या नामकरणाच्या कोनाशिलेचे अनावरण केले.या पर्यटन केंद्राचे नामकरण दि. 19 ऑगष्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे शुभ मुहूर्तावर,स्व.प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र कारंजा असे करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,यवतमाळ वनवृत्तचे वनसंरक्षक वसंत घुले,वाशिमचे उपवनसंरक्षक अभिजीत
वायकोस,कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती श्रीमती सईताई डहाके,दत्तराज डहाके,युसुफ पुंजानी  वसंत घुईखेडकर, पंचायत समिती सभापती प्रदिपबाप्पू देशमुख, अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड, कारंजा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष देवेन्द्र पाटील ताथोड, दिलीपराव जाधव यांची उपस्थिती होती.
            निसर्ग पर्यटन केंद्राच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना ना.वळसे-पाटील म्हणाले, स्व.प्रकाशदादा डहाके यांनी या पर्यटन केंद्राबाबत माझ्याशी अनेकदा चर्चा केली.एखाद्या शहरामध्ये अशाप्रकारची निसर्ग पर्यटन केंद्राची सुविधा उपलब्ध करून देणे ही साधी गोष्ट नाही. स्व.प्रकाशदादा डहाकेंचे स्वप्न होते की, "कारंजेकर नागरीकांना अविरत शुद्ध प्राणवायू देणारे, निसर्ग पर्यटन केंद्र उपलब्ध झाले पाहिजे." त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.वन विभागाने त्याला प्रतिसाद दिला. भविष्यात स्व. प्रकाशददादा निसर्ग पर्यटन केंद्रामुळे शुद्ध प्राणवायूच्या पर्यावरणपूरक वातावरणात राहण्याचा आनंद नागरिकांना मिळणार आहे. निसर्ग केंद्रातील जैवविविधता बघून नागरिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्यास प्रोत्साहित होतील.या स्व. प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्रात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वनमंत्री ना.मुनगंटीवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येईल.असे ते म्हणाले.
              स्व प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्राच्या निर्मितीस सहकार्य करणारे इंजिनिअर गजानन खेर,गोलू पुरोहित व अक्षय मुंगणे
यांचा ना.वळसे पाटील यांनी सत्कार केला.
         
यावेळी ना.वळसे-पाटील यांनी निसर्ग पर्यटन वाहनातून पर्यटन केंद्राची पाहणी केली.निसर्ग पर्यटन केंद्रात वृक्षारोपण केले.कार्यक्रमाला कारंजा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक वनसंरक्षक अमित शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 

स्व प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केन्द्र कारंजा हे 93 हेक्टर क्षेत्रावर आहे.यामध्ये बालकांसाठी बाल उद्यान आहे.बिबट,चितळ,सांबर, हरीण अशा विविध वन्यप्राण्यांच्या बोलक्या प्रतिमा या पर्यटन केंद्रात आहे.कॅक्टस उद्यान, जपानी पध्दतीने वृक्षलागवड केलेले मियावाकी उद्यान,विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती,विविध प्रकारचे पक्षी व सरपटणारे प्राणी या उद्यानात आहे. पर्यटन केन्द्रात मोरांचा सुमधूर टाहो आणि थयथयाट, हरीणाचा वावर येथे बघायला मिळतो. येथे ध्यान केंद्रसुद्धा आहे.निसर्ग पायवाट,निसर्ग पर्यटन वाहन,निसर्ग निर्वाचन संकुल,नैसर्गिक पाणवठे व बंधारे,व्यायामशाळा,रोपवाटिका,
सायकल सफारी,गवती कुरणाचे जंगल तसेच नक्षत्र वन यामध्ये आहे.एकंदरीत स्व.प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केन्द्रामुळे कारंजा नगरीच्या सांस्कृतिक वैभवाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याचे वृत्त कार्यक्रमाचे प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.

Post a Comment

0 Comments