कारंजा (लाड) ; स्थानिक शेतकरी निवास, मंगरूळपीर रोड, कारंजा येथे दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कारंजा तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पक्षातील आजी-माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी यांनी केले आहे.
आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी हे राहणार असून प्रमुख उपस्थितीत कारंजा कृ.उ.बा. समितीच्या सभापती सईताई डहाके, माजी जिल्हा परिषद सभापती जयकीसन राठोड,माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, मंगरूळपीर येथील माजी नगराध्यक्ष चंदुभाऊ परळीकर, अमरावती जिल्हा पक्ष निरीक्षक सोनालीताई ठाकूर, प्रदेश संघटक श्याम जाधव, यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक अशोक परळीकर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, माजी जि.प अध्यक्ष दिलीप जाधव, युवा नेते देवव्रत डहाके तसेच वाशिम व्यापारी असोसिएशन अध्यक्ष गोविंद वर्मासह मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कारंजा नगर परिषद चे आजी - माजी पदाधिकारी, नगरसेवक, जि.प पदाधिकारी, कारंजा प.स पदाधिकारी, कारंजा कृषी उत्पन्न समिती पदाधिकारी व कारंजा खरेदी विक्री संघ पदाधिकारी व सर्व ग्राम पंचायत सरपंच व सदस्य यांनी उपस्थित रहावे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रसार,विस्तार व पक्ष संघटन आदी बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात येणार असून बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी यांनी केले आहे.
0 Comments