मंगरुळपीर येथे उद्या रविवार दि. २७ रोजी संभाजी ब्रिगेडची 'तालुका आढावा बैठक' स्थानिक विश्रामगृह येथे दुपारी ठीक १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष मा.गजाननदादा भोयर तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड वाशिमचे जिल्हाध्यक्ष मा.गणेशभाऊ सुर्वे असणार आहेत. तसेच संभाजी ब्रिगेड वाशिमचे जिल्हा महासचिव मा.शेख इसाक, जिल्हा कार्याध्यक्ष मा.रमेश मुंजे, जिल्हा प्रवक्ता मा.विकास देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष मा.श्रीकृष्ण शिंदे आदींची उपस्थिती राहणार आहे.
या बैठकीत तालुका व शहर कार्यकारणी गठीत करणे, 'गाव तिथे शाखे' चे नियोजन, आगामी निवडणूकांबाबत चर्चा, संघटना/पक्षाची पुढील वाटचाल व आगामी काळात करावयाची कामे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून बैठकीला मंगरुळपीर तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच संभाजी ब्रिगेडमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या नव-युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड मंगरुळपीरचे तालुका अध्यक्ष अजय गवारगुरु यांनी केले आहे.
0 Comments