Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या हस्ते ५४ वृक्षांचे वृक्षारोपण


मंगरूळपीर  शहरातील बाजार समितीच्या मागील बाजूस असलेल्या स्मशानभूमी रोडच्या दुतर्फा बाजूस स्व कोकिळाबाई ठाकरे यांच्या समूर्तीप्रीत्यर्थ ता १७ रोजी वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते एकूण ५४ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
           शहरातील वॉर्ड क्रमांक १  मधील स्मशानभूमीत जाणाऱ्या कारंजा रोड पासून तर स्मशानभूमी पर्यंत जाणाऱ्या रोडच्या दुतर्फा बाजूला स्व कोकिळाबाई ठाकरे यांच्या समूर्तीप्रीत्यर्थ व नगरसेवक अनिल गावंडे व बाजार समितीचे सचिव रामकृष्ण उर्फ बाळू पाटील यांच्या पुढाकारातुन एकूण ५४ वृक्षांचे वृक्षारोपण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, आयोजित कार्यक्रमाला बाजार समितीचे उपसभापती राजकुमार गावंडे,संचालक ओम बंग,संचालक गिरीष बाहेती, संचालक शेरू मुन्नीवाले,व्यापारी मनोज छल्लांनी, अनिल बंग,नगरसेवक अनिल गावंडे,सचिव रामकृष्ण उर्फ बाळू पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत ठाकरे म्हणाले की जीवनात वृक्षाला किती महत्त्व असते, प्रत्येकाने वृक्षांविषयी इतरांना आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्यांना वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन याबाबत प्रेरित करावे.यावेळी नगरसेवक अनिल गावंडे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

Post a Comment

0 Comments