कोपरखैरणे, नवी मुंबई
वार्ताहर :
अनंतराज गायकवाड
कोपरखैरणे साई स्नेहदीप हॉस्पिटल येथे जरीना रहमान शाह या महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद झाली असून नेरूळ सेक्टर 4 येथील 'स्किन सोल' या क्लिनिक मध्ये मागील दहा वर्षापासून ही महिला कर्मचारी म्हणून कार्यरत होती. डॉ. स्नेह थडाणी यांच्या क्लिनिकमध्ये जरीना हिने आदल्या दिवशी दहा हजार रुपये चोरी केल्याच्या आरोपावरून पोलिसांच्या स्वाधीन न करता डॉ. थडाणी यांनी तिला बेदम मारहाण केली व दुसऱ्या दिवशी नेरूळ येथून आणून कोपरखैरणे सेक्टर 2 मधील स्वमालकीचे साई स्नेहदीप हॉस्पिटलमध्ये आणले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचे हेतूने जीवे मारले असल्याचा आरोप जरीनाच्या कुटुंबीयांनी केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पोलिसांकडे चौकशी केली असता पीएम झाल्याशिवाय एफआयआर दाखल केला जाऊ शकत नाही असे उत्तर मिळाल्याने पोलिसांबद्दल कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान या प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासन, साई स्नेहदीप हॉस्पिटल प्रशासन व डॉ. थडानी वादाच्या भोवरात सापडले आहेत. याप्रसंगी मृत जरीनाच्या कुटुंबीयांनी गुन्हा नोंदवल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने शिवसैनिकांच्या उपस्थितीत काही काळ हॉस्पिटलमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणात संध्याकाळी उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0 Comments