Ticker

6/recent/ticker-posts

बाल संगोपनात सावध ऐका पुढल्या हाका : डॉ. काश्मिरी बडबडेवात्सल्य मदर ॲण्ड चाईल्ड केअर आयोजित बालविकास कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी श्रावणी कामत 

पिंपरी, पुणे (दि. ०७ ऑगस्ट २०२३) आई बाबांनी बाळाचे संगोपन करताना काही बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बाळाची बौद्धिक क्षमता, बुद्धी विकास हा पहिल्या दोन वर्षांमध्ये होतो. बाळाने चालणे, बोलणे, ओळखणे या बाबी पहिल्या वर्षात झाल्या पाहिजेत. तसे होत नसेल तर बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासात काही समस्या असू शकतात. अशा वेळी पालकांनी विनाविलंब बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू केले पाहिजेत असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. काश्मिरी बडबडे यांनी व्यक्त केले.
  ऑटो क्लस्टर चिंचवड येथे भोसरी येथील वात्सल्य मदर अँड चाईल्ड केअर तर्फे पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांसाठी बालविकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी वात्सल्य रूग्णालयाचे संचालक डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. माधुरी आल्हाट, डॉ. संदीप कवडे, डॉ. शंकर गोरे, डॉ. अर्चना कवडे तसेच डॉ. स्वाती म्हस्के, डॉ. श्रद्धा चौधरी, डॉ. सारिका भोईर, डॉ. हेमा चंद्रशेखर, डॉ. बागेश्री देवकर, डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. विकास पाटील, डॉ. अरुण सोळसे, डॉ. महेश शेठे, डॉ. कल्याणी पेठकर आदी उपस्थित होते.
     किशोरवयीन मुलांचे संगोपन करणे, त्यांना समजून घेणे महत्त्वाचे असते. पालकांनी मुलांसमोर आपले वर्तन बोलणे, आचरण अनुकरणशील ठेवावे. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर ठेऊ नये. मुलं निसर्गत: घडत असतात. आपण त्यांना सहाय्यभूत ठरतील अशा गोष्टी कराव्यात. मूलांचे पालक बना मालक नाही असे संयोजक बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप कवडे यांनी सांगितले. 
   मानसोपचार तज्ज्ञ कल्याणी पेटकर, डॉ. अर्चना कवडे, डॉ. शंकर शोरे, डॉ. बागेश्री देवकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. रोहिदास आल्हाट यांनी स्वागत, प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूचसंचालन तर डॉ. अर्चना गोरे यांनी आभार मानले.
 डॉ. महेश शेटे डॉ. संदीप कवडे, डॉ. माधुरी आल्हाट, डॉ. स्वाती म्हस्के, डॉ. शंकर गोरे, डॉ. श्रद्धा चौधरी,  डॉ. सारिका भोईर, डॉ. हेमा चंद्शेखर, डॉ. बागेश्री देवकर, डॉ. अर्चना कवडे, डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. विकास पाटील, डॉ. अरुण सोळसे, डॉ. काश्मिरी बडबडे, डॉ. अर्चना ​​गोरे, कल्याणी पेठकर आदी.
-----

Post a Comment

0 Comments