कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) स्थानिक माळीपूरा कारंजा (लाड) येथील प्राचिन व ऐतिहासिक असलेले श्री एकविरा माता संस्थान विकासा पासून दुर्लक्षित असे होते.अनेकवेळा संस्थानच्या अध्यक्षा उर्मिलाताई इंगोले व विश्वस्तांनी,आ.राजेंद्र पाटणी यांना संस्थानला भेट देण्याचा आग्रह सुध्दा केलेला होता.परंतु आ.पाटणी यांचा देखील भेटीचा योगच जुळून येत नव्हता.अशातच संस्थानचे सेवाधारी आणि शहर भाजपाचे तरुण,तडफदार व कार्यदक्ष युवा नेते सत्यजीत उपाख्य बंटीभाऊ गाडगे यांनी देखील,माळीपुरा येथील श्री एकविरा संस्थानच्या भव्य अशा सभागृहाची मागणी रेटून धरली होती. दि.03 डिसेंबर 2023 रोजी कारंजा येथील, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत आणि दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने,संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या भव्य अशा मेळाव्याचे आयोजन करीत, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे विधायक आ. राजेंद्र पाटणी यांना उद्घाटक म्हणून निमंत्रीत केले होते. सदर मेळाव्याला अमरावती विधानपरिषद मतदार संघाचे सदस्य शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक,अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष नरेश गडेकर, झाडीपट्टी रंगभूमी अभिनेत्री आसावरी गडेकर,माजी नगराध्यक्षा उर्मिलाताई इंगोले, सौ आशाताई गाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी भव्य दिव्य मेळावा आणि संस्थानचे परिक्षेत्र पाहून,व्यासपिठावरून उद्घाटन पर संभाषण करतांनाच, लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटणी यांनी श्री एकविरा देवी संस्थानचे सभागृह आणि वॉल कंपाऊंडचे कामाकरीता जास्तित जास्त निधी देत असल्याचे जाहिर करीत, भाजपा युवा नेते सत्यजीत उपाख्य बंटीभाऊ गाडगे यांची मागणी मंजूर केली.त्यानुसार नुकताच विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर, आ.राजेंद्र पाटणी यांनी 40 लाख रुपये वॉलकंपाउंड करीता आणि 25 लाख रुपये सभागृहाकरीता मंजूर करून,यापुढे सुद्धा निधीची आवश्यकता पडल्यास निधी कमी पडू देणार नाही असे सांगीतल्याचे कळते.आ. राजेंद्र पाटणी यांच्या या श्री एकविरा देवी संस्थानच्या विकासकार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यामुळे त्यांचे आभार मानण्याकरीता,आणि माळीपूरा येथील सत्यजीत उपाख्य बंटीभाऊ गाडगे यांच्या सत्काराकरीता माळीपूरा कारंजा येथे स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांच्या अध्यक्षतेखाली,युवा सामाजिक कार्यकर्ते अँड संदेश जिंतुरकर तथा संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचे डॉ.कुंदन श्यामसुंदर यांच्या हस्ते सत्यजीत उपाख्य बंटीभाऊ गाडगे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड संदेश जिंतुरकर यांनी केले. आपल्या अध्यक्षिय भाषणातून बोलतांना संजय कडोळे म्हणाले, "आज बंटीभाऊ गाडगे यांच्यामुळे,ऐतिहासिक व प्राचिन अशा श्री एकविरा माता संस्थानच्या सभागृहाची व वॉलकंपाऊडची मागणी पूर्णत्वास जावू शकली असून याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच जाते." त्याशिवाय त्यांच्यामुळे आणि कारंजा शहर भाजपाचे अध्यक्ष ललित चांडक तथा सर्वच भाजपा कार्यकर्त्यामुळे ,माळीपुर्यातील रस्ते,पेव्हरब्लॉक,नाल्या व काँक्रेटिकरणाची अनेकानेक कामे मार्गी लागलेली असून सद्यस्थितीत सुरू झाली आहेत. या कार्यक्रमाला नंदकिशोर कव्हळकर,डॉ कुंदन श्यामसुंदर, रोमिल लाठीया,उमेश अनासाने, प्रदिप वानखडे,देविदास नांदेकर, मोहित जोहरापूरकर,ओंकार मलवळकर,हिमंत मोहकर, ज्ञानेश्वर खंडारे, कैलास हांडे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर कव्हळकर यांनी केले तर सत्यजित गाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments