Ticker

6/recent/ticker-posts

सेवाव्रती नारायणीबाई मुंदडा यांचा श्री चारभुजानाथ मंदिर विश्वस्त समिती व सकल राजस्थानी समाजा तर्फे भव्य नागरी सत्कार

     आदर्श व्यक्तिमत्त्वाचा सन्मान


मंगरूळनाथ येथील 
 भारतातील कानाकोपऱ्यात तीर्थक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी चाळीस वेळा  श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करणाऱ्या भाविक भक्तांना निशुल्क घेऊन जाणाऱ्या,  गोरगरिबांची सेवा करणाऱ्या, दानशूर, समाजासाठी आपले सर्वस्व देणाऱ्या नारायणीबाई सुखदेवजी मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला
 मंगरूळपीर नगरीत श्री चारभुजानाथ मंदिरात 
 सांस्कृतिक सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रम  बारामाही चालू असतात व त्याचे शुल्क घेण्यात येत नाही अशा मंदिराला  नारायणीबाई मुंदडा यांनी दहा लाख रुपयांची देणगी दिली या आर्थिक दानराशीने मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले
 मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र बजाज व सर्व सदस्यांच्या संमतीने मंदिराच्या भवानाला सुखदेव भवन हे नाव देण्यात आले
या कार्यक्रमाच्या अगोदर सात दिवसीय श्रीमद् भागवत कथेचे सुद्धा आयोजन करण्यात आले
हे सर्व साकार करणाऱ्या नारायणी बाई मुंदडा यांचे भव्य नागरी सत्कार याप्रसंगी करण्यात आले
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अकोल्या येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक शंकरलालजी बियाणी उपस्थित होते मानोरा येथून राधेश्याम हेडा वाशिम जिल्हा विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी सभेचे प्रदेश मंत्री शिवलाल भुतडा, अध्यक्ष कैलास मुंदडा, सचिव डॉक्टर सुनील गट्टानी, कारंजा येथून शेखरभाऊ बंग व्यसनमुक्ती सम्राट दिलीप गीलडा,मंगरूळनाथ तालुकाध्यक्ष हरीष बियाणी, अमरावती येथून जहागीरपुर हनुमान मंदिराचे अध्यक्ष ओमबाबू परताणी, मालेगाव येथून प्रा. पनपालिया, वाशिम येथून एड. विनोद बियाणी अकोला येथून डॉ. प्रा. सत्यनारायण बाहेती, नागपूर येथून पुरुषोत्तम लड्डा,नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे सामाजिक कार्यकर्ते,इंडियन गॅसचे संचालक , रमेश नावंदर व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी  यशस्वीतेसाठी श्री चारभुजा नाथ मंदिराचे विश्वस्त नरेंद्र बजाज, उमेश नावंदर, सुरेश राठी,अनिल बंग, भगवानदास जाखोटिया ,राजेश बजाज, बबलू भुतडा यांच्या सोबतच नथमल पुरोहित, किशोर भुतडा, नितीन बंग, सतीश भुतडा  यांनी अथक प्रयत्न केले अकोला येथून सुप्रसिद्ध गायक  सुनील नावंदर यांनी प्रोजेक्टरवर नारायणीबाई मुंदडा यांचे जीवनपट दाखविले  हे यावेळेस आवर्जून उपस्थित होते प्रास्ताविक उमेश नावंदर यांनी तर संचालन लता बजाज व नरेंद्र बजाज यांनी केले आभार प्रदर्शन संतोष बियाणी यांनी मानले

Post a Comment

0 Comments