Ticker

6/recent/ticker-posts

श्री वसंतराव नाईक महाविद्यालयात मतदार नोंदणी व युवा संवाद मार्गदर्शन शिबिर

मंगरूळपीर : स्थानिक श्री.वसंतराव नाईक कला व श्री.अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अ. राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनात व प्राचार्य डॉ.एस.एम.वडघुले यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संवाद व नव मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. वडगुले तर प्रमुख मार्गदर्शक मंगरूळपीचे तहसीलदार श्री.रवि राठोड साहेब व माजी मंडल अधिकारी श्री.दिलीप चौधरी, लिपिक श्री.रवी महल्ले, संगणक ऑपरेटर मिलिंद भगत व अनंता कोकरे यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.जी.ढाकुलकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.पी. आर.तायडे यांनी केले. 
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तहसीलदार श्री.रवि राठोड यांनी कोणताही पात्र व्यक्ती हा मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे याच अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी चा विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामुळे महाविद्यालयातील सर्व पात्र नव मतदार असलेले विद्यार्थी यांनी मतदार नोंदणी बाबत व लोकशाही बळकटी करण या विषयावर माजी मंडळ अधिकारी श्री दिलीप चौधरी यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे नव मतदार नोंदणी व युवा संवाद हा कार्यक्रम करणे किती आवश्यक आहे. याचे महत्त्व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रा.पी.एन.जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments