वाशिम दि. 2 ऑगस्ट
जिल्हा परिषद अंतर्गत लेखा विभागाच्या वतीने नुकतेच जिल्हा परिषद परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते पिंपळाच्या झाडाचे रोप लावुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कृषी व पशु संवर्धन सभापती वैभव सरनाईक, सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिपक खडसे यांची उपस्थि ती होती.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव यांच्यासह लेखा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने एकुण 25 झाडे लावण्यात आली. सदर झाडे जगवण्याची जबाबदारी वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत राबविलेल्या या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी कौतुक केले असुन प्रत्येक कर्मचाऱ्यांनी असा उपक्रम राबऊन पर्यावरण व स्वच्छतेचे जतन करण्याचे आवाहन केले. यावेळी लेखाधिकारी माणीक नागरे, सहा. लेखाधिकारी प्रविण पंधारे, बांधकाम विभागातील सहा. लेखाधिकारी सु. ब. जाधव, वित्त विभागाचे राहुल खडसे, मनोज जाधव, सहा. लेखाधिकारी संगीतराव जगताप, समाज कल्याण विभागाचे सहा. लेखाधिकारी रामानंद ढंगारे, मंगेश वाघ, सतिश पाटील , विनोद राठोड, गजानन खटके, स्वप्नील केळे, वैभव पांडूळे, श्रीमती राठोड, श्रीमती सरकटे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
0 Comments