वनोजा दि.१२/०८/२३
मंगरुळपिर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक १२ ऑगस्ट २३ रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले असता या सभेचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. आर पी कासलीकर यांनी भूषविले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गंगादीप राऊत(विशेष निमंत्रित स्थानिक),गजानन राऊत (उपाध्यक्ष पालक-शिक्षक समिती),डॉ. श्रीराम मुखमाले (सरपंच-ग्रामपंचायत वनोजा), रामेश्वर राऊत, (अध्यक्ष-तंटामुक्ती ग्राम समिती वनोजा), यशवंत राऊत (अधिक्षक/पालक-श्री शिवाजी बीसी वस्तीगृह वनोजा) आदींची उपस्थित होती.
याप्रसंगी सर्वप्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हार अर्पण गंगादिप राऊत, गजानन राऊत, डॉ.श्रीराम मुखमाले,रामेश्वर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी आर. पी. कासलीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पालक म्हणुन रामदास राऊत, कैलाश ढोकणे,संतोष राऊत,सुनिल राठोड,अनिल राऊत,गजानन सोनोने,शंकर मोहरे,गजानन गोरे,विनोद राठोड, ओमप्रकाश टोंचर,मदन चव्हाण, जगन्नाथ वैरागड,उमेश कुरवाडे यांच्यासह बहुसंख्येने पालकांची उपस्थिती होती.तसेच विद्यालयाचे शिक्षकवृंद एन.व्ही.देशमुख (क्रिडा शिक्षक),एस.आर.राठोड,
डी.एन.सांगळे,आर.ए.चपटे,
आर.एस.घुगे,डी.डब्ल्यु अवचार,कु.एम.आर.बेलोकार,
सौ.बी.एस.सोनटक्के,पो.हे.का.सुरेन्द्र तिखिले,शिवाजी आंधळे आदींची उपस्थिती होती.
सभेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी पर्यवेक्षक एस. पी. नारळे यांनी केले. त्यानंतर शैक्षणिक सत्र २०२३-२४ पालक शिक्षक समितीची निवड करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षा म्हणून कु. आर. पी. कासलीकर, उपाध्यक्ष गजानन राऊत, सचिव के. व्ही. घुगे, सहसचिव ज्ञानेश्वर नारायण कुरवाडे, गणेश रामदास अंदुले, राजेश सिताराम इंगोले, निलेश नामदेव जाधव, लक्ष्मण बळीराम गोरे, ज्ञानदेव तुळशीराम क्षीरसागर यांची कार्यकारणी सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच महिला प्रतिनिधी म्हणून जिजामाता बीसी कन्या वस्तीगृहाच्या पालक/अधिक्षिका श्रीमती सीमाताई सुनील राऊत, सौ. वर्षा रवींद्र काळे, सौ. निर्मला किशोर काळे यांची निवड करण्यात आली.
त्यानंतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पालक शिक्षक सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी यावर पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर गंगादीप राऊत, गजानन राऊत, यशवंत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी कु. आर पी कासलीकर यांच्या अध्यक्षीय मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. व्ही. घुगे, सचिव शिक्षक पालक समिती यांनी केले, तर आभार प्रदर्शन डी डब्ल्यू अवचार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments