Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी, अकोला.पदवी वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न

      अकोला                                     दिनांक:- 10-09-2023
             संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. द्वारा संलग्नित 
ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ द्वारा संचालित,   स्थानिक श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी, अकोला. सत्र 2021-2022 मधील बी.एस.डब्ल्यू फायनल इयर व एम.एस.डब्ल्यू फायनल इयर च्या विद्यार्थ्यांचा दिनांक 10-09-2023 रोजी.ठिक सकाळी 11.30 वाजता पदवी वितरण समारंभ घेण्यात आला.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संत शिरोमणी गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुरेशराव काळे साहेब (सचिव ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ खडकी),तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.गजानन वाकोडे (इतिहास अभ्यासक इंटरनॅशनल स्पीकर लोकसेवा अकॅडमीचे संचालक) होते. तर कार्यक्रमाला विशेष उपस्थित म्हणून प्रा.डॉ.संकेत काळे सर (अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती तथा सदस्य समाजकार्य अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती.) तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.केशव गोरे सर व समाजकार्य महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. एस.एम.भोवते सर कार्यक्रमाला विचार मंचावर  उपस्थित होते.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीत सादर करून पदवी वितरण समारंभ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विचार 
मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पदवी वितरण समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.कविता कावरे मॅडम यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रा. डॉ.गजानन वाकोडे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर निर्णय घेण्याची क्षमता मजबूत करा. आणि घेतलेला निर्णय कसा योग्य आहे. यासाठी सतत प्रयत्न करत रहा. जीवनात आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाण ठेवा. यासोबत अनेक ज्वलंत उदाहरणे देऊन आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुक्त केले. सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.केशव गोरे सर यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या आणि जिथे जाल त्या क्षेत्रात उंच भरारी घ्या आप-आपली स्वप्न पूर्ण करा. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. असे प्रतिपादन केले. यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस.एस.काळे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात समाजातील असलेल्या अनेक वाईट चालीरीती, परंपरा, समाजात होत असलेला अन्याय, अत्याचार, इत्यादी बाबींमध्ये परिवर्तन करण्याची ताकद आणि हिम्मत फक्त समाजकार्य अभ्यासक्रमात आहे.असे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांनी नेहमी मोठी स्वप्न पहावीत आणि जीवनात खूप मोठे व्हावे याकरिता विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात. तसेच बी.एस.डब्ल्यू व एम.एस.डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांनी आप- आपले  मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.डाॅ.अर्चना धर्में यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ.बी.एन.पाटील यांनी केले.ह्यावेळी BSW अभ्यासक्रमातील विद्यापीठातुन 8 विद्यार्थी Merit मध्ये आले. आणि MSW अभ्यासक्रमातील विद्यापीठातुन 2 विद्यार्थी Merit मध्ये आले. पदवी वितरण समारंभामध्ये एकूण 110 विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. वरील कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील प्रा. डॉ. बळीराम अवचार,प्रा.प्रफुल्ल पवार, डॉ.दिपाली देशमुख मॅडम,.प्रा.परळीकर मॅडम, प्रा.नवनाथ बडे,प्रा.मनोहर वागतकर, प्रा.डाॅ.केतन वाकोडे,प्रा.डॉ.प्रेमसिंग जाधव,प्रा.पी.आर. पाचपुते. व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 
(श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयात पदवी वितरण समारंभामध्ये प्रा.डॉ.संकेत काळे सर अध्यक्षीय भाषण करत असतांना उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी.)

(पदवी वितरण समारंभ कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले विद्यार्थी व कर्मचारी

Post a Comment

0 Comments