Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर तालुक्यात खताचा पुरेसा साठा उपलब्ध,पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांची माहिती

मंगरूळपीर ता ०१:जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि  कृषी विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरूळपीर तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता सदर तपासणीमध्ये तालुक्यामध्ये ता ०१ जुलै रोजी मुबलक प्रमाणात खत साठा असल्याचे आढळून आल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिल राठोड यांनी दिली आहे.
वाशिम जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार मंगरूळपीर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली असता आणि तपासणीच्या वेळी प्रत्यक्ष पाॅस मशीन व गोडाऊनची तपासणी केली असता साठा हा जुळून आला त्यामुळे सद्यस्थितीत तालुक्यामध्ये ता १ जुलै रोजी ४६१८ मे. टन खत साठा उपलब्ध असल्याचे अनिल राठोड यांनी सांगितले.    
        सद्यस्थितीत युरिया खताची आवश्यकता लक्षात घेता वाशिम जिल्हाधिकारी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांनी तालुक्या मधला जवळपास ७४ मेट्रिक टन साठा ता ३१ विक्रीकरीता मुक्त केल्यामुळे ता १जुलै रोजी तालुक्यामध्ये  युरीया खतसाठा उपलब्ध असुन सोबतच नॅनो युरिया, नॅनो डीएपी व ईतर खते  मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.या बरोबरच येत्या २ ते ३ दिवसांमध्ये वाशिम जिल्ह्या करिता आर सी एफ युरिया खताची एक रॅक येणार असून तो सुध्दा उपलब्ध होणार आहे.सोबतच शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते की, सोयाबीन हे  द्विदलवर्गीय, शेंगायुक्त पिक असल्यामुळे व आपल्या मुळावरील गाठीद्वारे हवेतून व जमिनीतून नत्र घेत असल्यामुळे अतिरिक्त नत्र  म्हणजेच युरीया खताची आवश्यकता नाही. तालुक्यातील खत साठा नियंत्रित करण्याकरिता पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिल राठोड आणि तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांची सर्वच कृषी सेवा केंद्रावर करडी नजर असून तालुक्यातील शेतकऱ्यांना खताबाबत काही अडचणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments