मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर विश्रांतीसाठी थांबलेल्या ट्रकमधून डीझेल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास चारचाकी गाडी व धारदार तलवारीसह पो.स्टे.कारंजा ग्रामीणच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
दि.३१.०७.२०२३ रोजी रात्री अंदाजे ०३.३० वा.चे सुमारास फिर्यादी करणकुमार किशोरी मंडल, वय २८ वर्षे, रा.श्रीपाथर सब्जी मार्केट, ता.श्रीपाथर, जि.बाका, राज्य बिहार हा त्याचा ट्रक क्र.OD11Z8158 ने समृद्धी महामार्गाने नागपूर वरून मुंबई जात होता. त्यास झोप येत असल्याने त्याने त्याचा ट्रक पो.स्टे.कारंजा ग्रामीण हद्दीतील ग्राम आखतवाडा जवळील प्रस्तावित पेट्रोल पंपाजवळ महामार्गाचे बाजूला लावून ट्रकमध्ये झोपी गेला असता एक इर्टीका गाडी क्र.MH14EQ3284 ने आलेल्या ३ ते ४ चोरट्यांनी ट्रकच्या डीझेल टाकीचे कुलूप तोडून त्यामधून अंदाजे १५० लिटर डीझेल अं.किं.१३,०००/- रुपयांचे डीझेल चोरून त्यांच्या इर्टीका गाडीमध्ये टाकले. तेव्हा चालकास जाग आल्याने व त्याने आरडाओरडा केल्याने तेथे पहाऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाच्या मदतीने एक आरोपी नामे हर्षद पांडुरंग साबळे, वय २२ वर्षे, रा.गजानन नगर, चिखली, जि.बुलढाणा यास ताब्यात घेतले तर उर्वरित साथीदार पळून गेले. पकडलेल्या चोरट्यास गाडीसह पो.स्टे.कारंजा ग्रामीण येथे आणून त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये चोरलेल्या डीझेलसह एक लोखंडी धारदार तलवार आढळून आली. सदर प्रकरणी पो.स्टे.कारंजा ग्रामीण येथे कलम ३७९, ३४ भादंवि सहकलम ४, २५ शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याच्या इतर साथीदारांचा तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे.कारंजा ग्रामीणचे ठाणेदार पो.नि.सुनील वानखडे, सपोनि.मोहोड, सफौ.धनराज पवार, पोहेकॉ.युसुफ भूरीवाले, नापोकॉ.युसुफ भूरीवाले यांनी पार पाडली.
( जनसंपर्क अधिकारी )
पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम.
0 Comments