Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम पोलीस दलातील एकूण 67 अंमलदारांना पदोन्नती

मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्या आदेशाने वाशिम पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र अश्या 55 अंमलदारांना पोलीस हवालदारपदी तर 12 अंमलदारांना सहा.पोलीस उपनिरीक्षकपदी एकूण 67 अंमलदारांना पदोन्नती दिली. त्यामुळे अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 
यावेळी एका चिमुकलीने 'ऐ वतन तेरे लीये...' हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.
मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदारांशी संवाद साधला व त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्वांचे जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.
     
मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह(IPS)'पोलीस दलामध्ये तणावपूर्ण परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना सर्वांनी स्वतःच्या मानसिक व शारीरिक स्वास्थाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे' असे प्रतिपादन केले. 
कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत आपल्या कार्याला एक नवीन दिशा देऊन समाजावर स्वतःचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या व इतरांना प्रेरणादायी ठरणाऱ्या
आपल्या व्यक्तिमत्वाला
वाशिम जिल्हा पोलीस दलाला वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने जय हिंद...!
सदर समारोप समारंभाला वाशिम पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.
       पदोन्नती सोहळ्याचे काही                            क्षणचित्रे...  

Post a Comment

0 Comments