Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीरात 15 ऑगस्ट ला निघाली तिरंगा रॅली



मंगरूळपीर ता १६: (ता/प्र) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १५ ऑगस्ट रोजी भाजपाच्या वतीने झेंडावंदन करून तिरंगा रॅली निघाली सदर रॅलीला भाजपा यवतमाळ-वाशिम लोकसभेचे संयोजक राजू पाटील राजे यांनी हिरविझेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
          यावेळी आपले विचार व्यक्त करताना राजूपाटील राजे म्हणाले की भारतीय स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. आपला देश जगात प्रथम क्रमांकावर मार्गक्रमण करीत आहे. हा अमृत काळ आपण सर्व अनुभवत आहोत. आज जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती ठेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी. या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी हर घर तिरंगा अभियान राबविले जात असून आजच्या “घरोघरी तिरंगा” रॅली उपक्रमातून देशभक्तीची आंतरिक प्रेरणा मिळते आहे.यानंतर रॅलीला सुरुवात झाली,रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून, बिरबलनाथ महाराज चौक, दर्गाह चौक,नासरजंग चौक,विरभगतसिंग चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,बसस्थानक चौक,बायपास रोडवरून परत छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचे समापन करण्यात आले, या रॅली मध्ये 1 हजाराच्या वर नागरिक आपल्या मोटारसायकल वर तिरंगा झेंडा लावून सहभागी झाले होते. रॅलीचे आयोजन भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य पुरूषोत्तम चितलांगे,नागेश घोपे,तालुका अध्यक्ष रवींद्र ठाकरे,शहर अध्यक्ष श्याम खोडे,व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष सुनील मालपाणी, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष मो.शारीक,माजी नगराध्यक्ष विरेंद्रसिंग ठाकूर, अनिल गावंडे,गोपाल खोडके,गोपाल वर्मा यांचेसह भाजपाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले होते.

Post a Comment

0 Comments