Ticker

6/recent/ticker-posts

तोतया पीएसआयला बेड्या;

 तोतया पोलिस अधिकारी बनून अहमदनगर शहरात तब्बल तीन महिने सराईतपणे फिरणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली. सतीश काशिनाथ झोजे (वय २९, रा. ढवणवस्ती, तपोवनरोड, मूळ रा. मालुंजा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.याबाबत अधिक माहिती अशी, की सतीश झोजे तोतया पोलिस अधिकारी बनून लोकांची फसवणूक करत असून सध्या तो पाईपलाईन रस्त्यावरील सिटी लॉनजवळ आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली.आहेर यांनी तात्काळ त्यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने संबंधित ठिकाणी जावून पाहणी केली असता रस्त्याच्या कडेला एका कारजवळ झोजे उभा होता. त्याची चौकशी केली असता त्याने आपण पोलिस मुख्यालयात उपनिरीक्षक असल्याचे सांगितले. मात्र, अशा नावाचा कोणीही पीएसआय मुख्यालयात नोकरीला नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.त्यानंतर पथकाने झोजे याला ताब्यात घेतले. त्याच्या वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता उपनिरीक्षक नावाची नेम प्लेट, टोपी, त्यावर राजमुद्रा असलेला मोनोग्राम, बेल्ट, बूट, लाईन यार्ड असा पोलीस उपनिरीक्षकाचा संपूर्ण गणवेश मिळून आला. त्याला अटक करण्यात आली. पोलिस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, सचिन अडबल, रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, फुरकान शेख, संतोष खैरे, विशाल गवांदे, रणजीत जाधव, अमृत आढाव, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड आदींनी ही कारवाई केली.नातेवाईकांच्या टोमण्यांनी बेजारआपण केवळ मित्र- नातेवाईक यांना दाखविण्यासाठीच तोतया पोलिस अधिकारी बनलो असल्याचे सतीश झोजे याने सांगितले.कुणाचीही फसवणूक केली नसल्याचेही त्याचे म्हणणे आहे. कामधंदा नसल्याने नातेवाईक हिणवत होते. त्यामुळे आपण पीएसआय झाल्याचे सर्वांना सांगितले असल्याचे झोजे याने सांगितले.

Post a Comment

0 Comments