Ticker

6/recent/ticker-posts

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नागपूरकरांना मिळाला वाली; नवनियुक्त आयुक्त, जाणून घ्या...

       नागपूर महापालिकेचे नवे       आयुक्त म्हणून डॉ. अभिजित     चौधरी यांची नियुक्ती

नागपूर : नागपूर महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील २०११ तुकडीचे अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आयुक्त असलेले राधाकृष्णन बी. हे उच्चशिक्षणासाठी परदेशात गेल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता.छत्रपती संभाजीनगर येथे राज्य सरकारच्या कर विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत डॉ. चौधरी यांनी एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्याकडे नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारीपदाचा अतिरिक्त कार्यभारही असेल. मूळचे भुसावळचे डॉ. चौधरी यांनी मुंबईच्या केईएममधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१०मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून कर्नाटक कॅडरमध्ये नियुक्ती झाली होती. मात्र, प्रशासकीय अधिकारी होण्याचे लक्ष्य बाळगून २०११मध्ये रँकिंग सुधारत त्यांनी पुन्हा प्रशासकीय सेवेची परीक्षा देत यश मिळवले. राज्य कर विभागापूर्वी ते काही काळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त होते.सामान्य प्रशासन विभागाने नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे सीईओ अजय गुल्हाने यांची महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त म्हणून बढतीवर बदली करण्यात आली आहे. गुल्हानेंकडे नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभारही होता. त्यामुळे हा कार्यभार त्यांना इतर अधिकाऱ्यांना हस्तांतरित करून तत्काळ नव्या ठिकाणी रुजू होण्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments