Ticker

6/recent/ticker-posts

१८ वा अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात वाशिम घटक उपविजेता ; ०४ सुवर्ण, ०७ रजत व ०३ कांस्य अशा एकूण १४ पदकांची कमाई.

   १८ वा अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा नुकताच अकोला पोलीस घटकामध्ये पार पडला. सदर कर्तव्य मेळाव्याकरिता अमरावती परिक्षेत्रातील एकूण ०५ जिल्हा पोलीस घटकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये वाशिम पोलीस दलातील ०५ पोलीस अधिकारी व ११ पोलीस अंमलदार अशा एकूण १६ पोलीस अधिकारी - अंमलदारांनी सहभागी होत १४ पदकांची कमाई करत परिक्षेत्रातील उपविजेतेपद पटकाविले आहे.
          
त्यामध्ये पोनि.रामेश्वर चव्हाण यांनी गुन्हे तपास, कायदे व नियम पद्धती व न्यायनिर्णय लेखन या विषयात सुवर्ण पदक, पोहवा.महेश आखरे यांनी घटनास्थळ निरीक्षण चाचणीमध्ये सुवर्ण पदक, पोहवा.जयप्रकाश सुपारे व धनंजय पवार यांनी वाहन तपासणीमध्ये सुवर्ण पदक तर पोशि.व्यंकटेश रावलेवाड यांनी श्वान रॉयसह अंमली पदार्थ शोधक चाचणीमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तर फिंगर प्रिंट प्रात्यक्षिकमध्ये सपोनि.महेंद्रा गवई यांना रजत पदक, फोरेन्सिक सायन्स लेखी परीक्षेमध्ये पोहवा.महेश आखरे यांना रजत पदक, लेबलिंग & पॅकींगमध्ये सपोनि.महेंद्र गवई, पोउपनि.विजय चव्हाण व पोहवा.महेश आखरे यांना रजत पदक, फोटोग्राफी टेस्ट व पोलीस पोट्रेट टेस्टमध्ये पोउपनि.सचिन गोखले यांना ०२ रजत पदक, रूम सर्च मध्ये नापोकॉ.धनंजय पवार यांना रजत पदक तर ग्राउंड सर्चमध्ये पोकॉ.कान्होबाराव म्हस्के यांना रजत पदक मिळाले आहे. त्याचबरोबर पोलीस पोट्रेट टेस्टमध्ये पोहवा.महेश आखरे यांना कांस्य पदक व पोकॉ.गोपाल चौधरी यांनी संगणक जनजागृती स्पर्धा तोंडी परीक्षेमध्ये कांस्य पदक पटकाविले आहे. अश्याप्रकारे सुवर्ण पदक ०४, रजत पदक ०७ व कांस्य पदक ०३ असे एकूण १४ पदकांची कमाई करत वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या संघाने अमरावती परिक्षेत्रातून विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
          त्यानिमित्ताने दि.०५.०७.२०२३ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथील सभागृहात मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी सर्व विजेत्या स्पर्धक पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक करत त्यांना मेडल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.


(जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधिक्षक कार्यालय,
   वाशिम यांचेकरिता

Post a Comment

0 Comments