Ticker

6/recent/ticker-posts

राज्यपाल नियुक्त आमदारांचं प्रकरण पुन्हा हायकोर्टात; उद्या होणार सुनावणी



जून २०२० पासून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं प्रकरण पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाच्या सुनावण्या झालेल्या आहेत. येत्या बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.कोर्टाच्या कचाट्यात सापडलेलं हे प्रकरण हायकोर्टात आलेलं आहे. या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मुभा दिलेली होती. तर दुसरे याचिकाकर्ते सुनिल मोदी यांना हायकोर्टात पुन्हा दाद मागयची असेल तर मागा, असं कोर्टाने म्हटलं होतं.
त्यानुसार आता सुनिल मोदी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे. उद्या कोर्टात नेमकं काय होतंय, त्यावर १२ आमदारांच्या नियुक्तीचं भविष्य अवलंबून आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीच्या निर्णयावर बुधवारी सुनावणी होईल. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.
राज्यातील सत्ता बदलानंतर याबाबत एक वेगळी याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आधीची यादी परत पाठवली. हे कृत्य नियमात बसणारं नाही, असं सांगत न्यायालयात आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आता त्यावर काय निर्णय येतो, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

Post a Comment

0 Comments