Ticker

6/recent/ticker-posts

भूमिपुत्र शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने मानोरा ,मंगरूळ पिर,कारंजा लाड , येथील पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीतआढावा बैठक

भूमिपुत्रचा लढा कृषीपंपाना मोफत व मुबलक वीजेसाठी

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना मोफत,मुबलक आणि मागेल त्या ठिकाणी योग्य दाबाचा विज पुरवठयाचा निर्णय शासनाने घेई पर्यंत तथा शेतकऱ्यांवर दाखल झालेले विज चोरीचे संपुर्ण गुन्हे सरकार मागे घेत नाही तोपर्यंत भूमिपुत्रचा लढा सुरूच राहणार आसल्याचे सुतोवाच भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी काल मंगरूळनाथ येथिल भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कारंजा तालुका, मानोरा तालुका व मंगरूळनाथ तालुक्याच्या संयुक्त आढावा बैठकी समोर केले.
मंगरूळपीर येथे 30 जुलै रोजी  भूमिपुत्र शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने मानोरा ,मंगरूळ पिर,कारंजा लाड , येथील पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीतआढावा बैठक पार पडली .

सामाजिक कार्यकर्ते सुधाकर राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
    मंगरूळनाथ येथे काल भूमिपुत्र शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण आढाव बैठक संपन्न झाली. आनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भूमिपुत्र शेतकरी संघटने मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आशा सर्व कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन त्यांना संस्थापक अध्यक्षांच्या हस्ते पदे देण्यात आली. बोगस बियाणे, अतिवृष्टीची मदत तथा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा  करण्यात आली. बैठकीचे आयोजन मंगरूळनाथ तालुकाध्यक्ष गुणवंतराव ठाकरे यांनी केले होते. बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ शेवाळे, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन काकडे, युवक प्रदेश उपाध्यक्ष केशव गरकळ,
 मानोरा तालुकाध्यक्ष भुषण मुराळे, कारंजा तालुकाध्यक्ष देवेंद्र लांडकर, हरिभाऊ ठाकरे, विजयराव देशमुख, पंकज इंगळे, विजय सावके, बाळु रोकडे,नागेश भारती, सुधाकर राऊत, विलास गहुले, जगदीश राठोड, चंद्रकांत काटे, पंकज इंगळे, 
आकाश मोहकार, किशोर डाहाके, अजय मोहाडे, नागेश म्हस्के, धनंजय सोंके, मनोहर राठोड, प्रल्हाद राठोड,विलास मनवर यांच्यासह भूमिपुत्र चे तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार गुणवंत ठाकरे यांनी तर , सूत्रसंचालन:  देवेंद्र पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments