दिनांक २९ जुलै २०२३ रोजी वाशिम मंगरूळपीर मतदार संघाचे आमदार लखनजी मलिक साहेब यांच्याकडून मतदारसंघातील मंगरूळपीर तालुका येथील सर्व शासकीय अधिकारी यांच्याकडून सध्य परिस्थिती मध्ये मंगरूळपीर अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या जिवीत हानी, वित्तहानी विविध सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान इत्यादी बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
मतदार संघात सुरू असलेल्या कामांचा, नव्याने प्रस्तावित केलेले कामांचा आढावा घेतला, पूर्ण झालेल्या कामांचा अपूर्ण कामांचा सुद्धा आढावा घेण्यात आला. मंगरूळपीर तालुक्यातील व शहरातील वीरेंद्रसिंह ठाकूर सर यांच्या घरासमोरील रोडचे भूमिपूजन करण्यात आले होते त्या रोडचे काम अध्यापर्यंत पूर्ण करण्यात आले नाही बंधित ठेकेदारावर व अधिकार्यावर कारवाईचे आदेश व हुडको कॉलनी ते दारूबंदी रोडवरील डीपी हटवून तात्काळ काम सुरू करावे शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी असे नगरपरिषद मुख्याधिकारी मंगरूळपीर यांना सुद्धा निर्देश देण्यात आले कामचुकार करणाऱ्या ठेकेदारावर लायसन निलंबनाची कारवाई करा आणि तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणासाठी कोणी पैशाची मागणी करत असेल तर संबंधित अधिकाट्यावर कर्मचा (यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश,अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करून तात्काळ अनुदान मिळेल या हेतूने परिसरातील पंचनामे करावे कोणताही भेदभाव न करता खेळ्यापाळ्यातील शेतकऱ्यांना व शेतमजुरांना अडचण जाऊ नये व विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायत वर याद्या लावण्यात याव्या असे निर्देश सुद्धा देण्यात आले
वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लखनजी मलिक, व त्यांचे पी ए योगेशभाऊ देशपांडे , शिवसेना तालुकाप्रमुख मनीष गहूले पाटील यांच्या उपस्थितीत
यावेळी उपविभागीय अधिकारी सखारामजी मुळे, महसूल व तहसीलदार रवि राठोड, माजी नगराध्यक्ष वीरेंद्रसिंह ठाकूर. भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर संजय राऊत , श्रीरंग पाटील सामाजिक कार्यकर्ते , विनोद पाटील जाधव, अरुण पाटील थेर, बाळू पाटील ठाकरे, राजेश जाधव, रवी लांबाडे, संतोष बारड, देवमन पाटील, सागर शिंदे, माणिक शिंदे, संतोष ठाकरे, तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा सोमवारी शेतकऱ्याच्या बांधावर आमदार लखनजी मलिक पाहणी करणार असल्याचेही योगेश भाऊ देशपांडे यांनी सांगितले
0 Comments