Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये वाशिमच्या कारंजा तालुक्यातील संजय बहाळे आणि मनीषा बहाळे या दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

वाशिम, 1 जुलै : समृद्धी महामार्गावर आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात शनिवारी पहाटे घडला आहे. या अपघातामध्ये बसमधील तब्बल 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शिवनगरचे संजय बहाळे आणि मनीषा बहाळे या दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एमपीएससीचे क्लास करण्यासाठी मनीषा आपल्या काकांसोबत पुण्याला येत होती.
मनीषा बहाळे अतिशय होतकरू आणि हुशार विद्यार्थीनी होती. तिचं भविष्यात प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न होती. यासाठी ती तिच्या काकांसमवेत पुण्याला एमपीएससीचे क्लास करण्यासाठी शुक्रवारी रात्री कारंजाच्या हॉटेल राधा कृष्ण जवळून रात्री साडेअकराच्या दरम्यान विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस मध्ये बसली. केवळ दोन तासातच काका आणि पुतणीचा बस अपघातात होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे मनीषाला तिच्या स्वप्नाची पूर्तता होण्याअगोदरच काळाने हिरावून घेतले. या घटनेमुळे शिवनगर गावावर शोक कळा पसरली आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्स बस चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


आरटीओच्या प्राथमिक अहवाल आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहन चालकाला अटक केली. वाहनचालक दानिश शेख इस्माईल शेखवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी 304, मोटर व्हेईकल ऍक्ट 134, 184, 279 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून 25 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका वाहन चालकावर ठेवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments