राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. त्यानंतर सोमवारी शरद पवार मैदानात उतरले आहे. मग अजित पवार यांच्यासोबत गेलेले नेते परत येऊ लागले आहे. आज एका मोठ्या नेत्याने हा निर्णय जाहीर केला.
कोण आले शरद पवार यांच्यासोबत
अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेला खासदार काही तासांत शरद पवार यांच्या गटात आला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे आता शरद पवार यांच्यासोबत आले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।” मी साहेबांसोबत.
आव्हाड यांनी केले ट्विट
अमोल कोल्हे परत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. पहिला मोहरा परत आला, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. आता अनेक जण परत येणार असल्याचा दावा त्यांनी केला. अनेक जणांनी आपली दिशाभूल झाली होती, असा दावा केल्याचे त्यांनी सांगितले. आपण उद्या शरद पवार यांची भेट घेणार आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही परतले
हिंगोलीचे आमदार राजू नवघरे हे शरद पवार यांच्या गटात दाखल झाले आहे. काल ते अजित पवार यांच्याबरोबर होते. परंतु ज्या व्यक्तीने आपणास मोठे केले, त्यांना कसे सोडावे? हा प्रश्न करत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.शरद पवार यांनीही रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक जण परत येणार असल्याचा दावा केला होता. तो दावा आता खरा होऊ लागला आहे. आता अजून कोण शरद पवार यांच्या गटात येणार? हे काही कालावधीत स्पष्ट होणार आहे.
0 Comments