Ticker

6/recent/ticker-posts

अकोला महानगरातील दूषित पाणीपुरवठा त्वरित बंद करा.! समाजसेवक गजानन हरणे यांची मागणी.

 अकोला............................. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दूषित, अस्वच्छ, मातीमिश्रित हिरव्यागार पाण्याचा पुरवठा सध्या शहरातील लोकांना  करण्यात येत आहे .तरी तो  त्वरित थांबवा अन्यथा महानगरपालिकेसमोर जनआंदोलन करण्याचा इशारा गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जण अदोलन ने दिला आहे.
 महानगराच्या परिसरामध्ये  पावसाळा लागल्यापासून  गेल्या कित्येक दिवसापासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. एका इकडे महानगरपालिका जनते जवलून मोठ्या प्रमाणात वाढीव पाणीटॅक्स घेत असताना अशा प्रकारचा निर्लज्जपणा महानगरपालिकेने करू नये अन्यथा महानगरपालिकेच्या विरुद्ध जनआंदोलन उभारला जाईल याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची राहील राहिला. तरी सुरू असलेला दूषित पाणीपुरवठा ताबडतोब पाणीपुरवठा विभागाने बंद करावा .शुद्ध स्वच्छ पाणी शहरातील नागरिकांना द्यावे. तसेच मनपा च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. अकोला शहरात पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा कलर हिरवागार असून अति दुर्गंधीत वास येत आहे. तरी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी ,जनप्रतिनिधी यांनी या  गंभीर गोष्टीची त्वरित दखल घेऊन यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जणआंदोलना चा वतीने गजानन हरणे यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे केली आहे.    

Post a Comment

0 Comments