वाशिम,२८ खाण मंत्रालय आणि पोलाद मंत्रालय जेएनएआरडीडीसी,नागपूर आणि नाल्को,एनएमडीसी आणि एमएसटीसी आणि एमआरएआय यांच्या सहकार्याने वर्तुळाकार अर्थव्यवस्था मोहिमेची मालिका आयोजित करीत आहे. सन २०२३ हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या स्मरणार्थ आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पर्यावरणासाठी टिकाऊपणा/जीवनशैलीवर आधारित आहे.
मेटल क्षेत्रातील वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबद्दल जागरूकता आणण्यासाठी,जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाइन सेंटर विदर्भातील ११ जिल्ह्यांतील २२ ULB शाळांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित करत आहे.त्याचाच एक भाग म्हणून ९ वा कार्यक्रम आज वाशिम येथील नियोजन भवनातील सभागृहात संपन्न झाला.राणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल व जि.प. हायस्कूल,मंगरुळपीर येथील विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांच्याहस्ते झाले.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बारसू,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, शिक्षणाधिकारी (योजना) गजानन डाबेराव, विस्तार अधिकारी (शिक्षण ) विश्वनाथ भालेराव,भाऊराव भालेराव, कार्यक्रम अधिकारी मंगेश गवई, वैज्ञानिक डॉ.उपेंद्र सिंग,डॉ.प्रविण भुकटे,आयोजक आर.विशाखा आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments