Ticker

6/recent/ticker-posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात यावा मा.जि.प. अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे

             मा.जि.प, अध्यक्षा 
           सौ. ज्योतीताई गणेशपुरे 

 वाशिम
जिल्ह्यातील मागील दोन दिवसापासून सतत मुसळधार पावसाने माजवलेल्या थैमानामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली खरडली. शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणत अतोनात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात घराची पडझड झाली असून एक आठवडा भरापासून सतत पावसाचा जोर सुरू असताना शेतात व घरात सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. या गंभीर विषयी पावसाळी अधिवेशनात शासनाने भरीव आथीक मद्दत जाहीर करुन शेतकरी मदतीचा दिलासा देण्याची भावना व्यक्त केली आहे. नुकसानग्रस्थांना आर्थिक मदत देण्यात यावी असे मा.जि.प, अध्यक्षा सौ. ज्योतीताई गणेशपुरे यांनी निवेदाद्वारे मागणी केली आहे. वाशिम जिल्हयातील शेतात पाणीच पाणी साचल्या मुळे पिके संकटात सापडली
असताना शुक्रवारी रात्री पासूनच
पावसाने कहरच केला आहे. ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे अनेक नागरीकांच्या घराची पडझड झाली असून घरातील अन्य धान्य, शेती माले वाहून गेले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खायचे काय व जगायचे कसे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा समोर उभा आहे. हजारो हेक्टर शेतीचे स्मांतर तलावात झाले आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वयो वृध्द, लहान मूल, महिला यांचे हाल झाले आहे आता बी बियाण्यांचे कर्ज फेडायचे तरी कसे याच चींताचुर परिस्थितीत शेतकन्यांमध्ये दिसून येत आहे सर्व शेतकरी बांधवांचे आता पावसाळी अधिवेशनाकडे आस लावून बसलेला आहे अशा या पूरग्रस्त परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची अपेक्षा सौ ज्योतीताई गणेशपुरे यांनी सरकारकडे व्यक्त केली आहे संपुर्ण जिल्हात 'तालुक्यातील धरण ओवर फ्लो झाल्या मुले सर्व पाणी शेतात शिरले आहे. नदी नाल्याला पुर आल्यामुळे शेतातील पिके खरडून गेली आहे. व जिल्हातील नदी व नाल्या काठावरील वसलेली गावे यांना मोठ्या प्रमानात धोका निर्माण झाला आहे. तर काही गावात पुराचे पाणी शिस्न शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे दि. २१ व २२ जुलै रोजी तुफान पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांनी प्रयत्न करावे अशी मांगणी सौ ज्योतीताई गणेशपुरे यांनी केली.

Post a Comment

0 Comments