Ticker

6/recent/ticker-posts

धारदार तलवार बाळगून दहशत पसरविणाऱ्या युवकास तलवारीसह अटक.


       
पो.स्टे.मालेगाव हद्दीमध्ये विनापरवाना घातक धारदार शस्त्र अवैधपणे बाळगत दहशत पसरविणाच्या प्रयत्नात असलेल्या २३ वर्षीय आरोपीविरुद्ध पो.स्टे.मालेगाव येथे कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दि.०२.०७.२०२३ रोजी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून मालेगाव शहरातील नगरपंचायत मागे असलेल्या नवीन मालेगाव येथे राहणारा आकाश मधुकर डोंगरे, वय २३ वर्षे हा हातात तलवार घेऊन फिरत असून परिसरात दहशत पसरवित आहे. त्यावरून सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीविरुद्ध पो.स्टे.मालेगाव अप.क्र.३०२/२३, कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
     सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.दत्तात्रय आव्हाळे, सपोउपनि.रवी सैबेवार, पोहेकॉ.कैलास कोकाटे, प्रशांत वाढणकर, नापोकॉ.शिवाजी काळे, शैलेश ठाकूर, पोकॉ.अमोल पवार, जयशंकर पाटील यांनी पार पाडली. नागरिकांनी सुजाण नागरिक या नात्याने अवैध शस्त्र धारकांची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष, वाशिम किंवा DIAL ११२ ला द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
   *( जनसंपर्क अधिकारी )*
पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम.

Post a Comment

0 Comments