Ticker

6/recent/ticker-posts

ह भ प वासुदेव महल्ले पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्नअकोला..

 श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोटचे अध्यक्ष तथा पालखी सोहळा प्रमुख श्री.ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले पाटील यांचा भगवान श्री पंढरीनाथांच्या दरबारात साधुसंतांच्या व वारकरी भाविकांच्या आशीर्वादाने  त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळेत थाटात संपन्न झाला. 
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र आळंदीचे सचिव गुरुवर्य श्री.ह.भ.प. बाजीराव महाराज चंदिले नाना, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री.ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री, नरहरी महाराज चौधरी, ह भ प शारंगधर महाराज मेहुणकर, वासुदेव महाराज खोले गुरुजी, सुरेश महाराज तळवेलकर, गजानन महाराज भाटे, सदानंद महाराज गावंडे, माणिकराव महाराज भगत, सुदाम महाराज उके, वासुदेव महाराज अस्वार, दत्ताभाऊ अटकळे, गणेशराव खदळे, बळीराम गीते, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सानंद संपन्न झाला.
        अभिष्टचिंतन सोहळ्याच्या प्रारंभी श्रीगुरुपूजन, दीप प्रज्वलन संपन्न होऊन मान्यवरांचे स्वागत संपन्न झाले. तद्नंतर सत्कारमूर्ती श्री.ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले व सौ. शालिनीताई वा. महल्ले या उभयतांचा सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ महाराज मंडळी यांच्या हस्ते हृद्य सत्कार सोहळा संपन्न झाला. मान्यवरांची आशीर्वादपर भाषणे पार पडली. यामध्ये श्री संत वासुदेव महाराज यांचे अलौकिक कार्य, श्री वासुदेवरावजी महल्ले यांचा कार्यगौरव, श्री संस्थेचे व विश्वस्त मंडळाचे सेवाकार्य, त्याचप्रमाणे वासुदेव भक्तांची अनन्यसाधारण निष्ठा, यांबाबत मान्यवरांनी भरभरून वर्णन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प अंबादास महाराज मानकर, प्रास्ताविक श्री उमेश महाराज मोहोकार, आभार प्रदर्शन विश्वस्त श्री गजाननराव दुधाट यांनी केले. याप्रसंगी विश्वस्त मंडळातर्फे श्री रवींद्रजी वानखडे, श्री महादेवराव ठाकरे, अशोकराव पाचडे, अनिलभाऊ कोरपे, केशवप्रसाद राठी,  पुरुषोत्तम मोहोकार, आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री नितीनभाऊ भगत, नागोराव बायस्कार, विठ्ठलराव मंगळे, विष्णू महाराज गावंडे, सागर महाराज परिहार, ज्ञानेश्वर नराजे, अविनाश सावरकर, अनिल नराजे, संतोष मंगळे, मदन मोहोकार, बापजी शिंदे, गोपाल वानखडे, महादेवराव बोरोकार, बाळकृष्णजी वाकोडे, प्रमोद बिहाडे, रवी मोहोड, आदींनी परिश्रम घेतले. अशी माहिती वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  दिली आहे.               

Post a Comment

0 Comments