कारंजा : कारंजा शहरातील अत्यंत सुस्वभावी,मनमिळाऊ व विश्वासू स्वभावाचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असलेले आय.के. परमार यांचे शनिवार दि २९ जुलै रोजी रात्री दुर्धर आजाराने निधन झाले असून,त्यांची अंतिम यात्रा, नमाजे जोहर बाद,रविवार दि ३० जुलै रोजी दुपारी २:०० वाजता नंतर,नगीना मस्जिद कारंजा येथून निघणार असल्याचे वृत्त मिळाले आहे.त्यांचे पश्चात साहिल परमार आणि आदिल परमार अशी दोन मुले आहेत. त्यांच्या मृत्युमुळे परमार कुटूंबाच्या दुःखात ईरो फिल्मस, आदर्श जय भारत सेवाभावी संस्था,विदर्भ लोककलावंत संघटना इत्यादी सहभागी असून श्रध्दांजली समर्पित करीत आहेत. आय.के.परमार यांचे सराफ लाईन कारंजा येथे,मॉर्डन फ्रेमिंग आर्ट हे प्रतिष्ठान होते. कलाक्षेत्राशी त्यांचा जवळचा संबध होता.आयुष्यभर ते कला हेच जीवन म्हणून जगले.ते उत्कृष्ट असे कथा,पटलेखक, चित्रपट दिग्दर्शक,व्यंगचित्रकार होते.अनेकवेळा मोठमोठ्या दैनिकांनी आणि साप्ताहिकांनी त्यांच्या व्यंगचित्रांना प्रसिद्धी दिली होती.सन १९८४ मध्ये त्यांनी कारंजाच्या कलाकारांना संधी देऊन 'दिल से दूर' हा व्हिडोओ चित्रपट तयार केला होता. तर अलिकडील काळात ईरो फिल्मसच्या जय हो भारत अभियान या राज्यस्तरिय राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रमाशी निगडीत असलेल्या लघु चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.कारंजा येथील सार्वजनिक उपक्रमात त्यांचा सदोदीत सहभाग राहीला होता. त्यांना विविध संस्था संघटना कडून अनेक वेळा राज्यस्तरिय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या अकाली निघून जाण्याने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे .
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments