मंगरूळपीर उपविभागीय पोलीस अधिकारी पदी निलीमा आरज आज दिनांक 4 जुलै 2023 रोजी रुजू झाल्या असून मंगरूळपीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दिनांक 24 मे पासून उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय यशवंत केडगे बदलून गेले. तेव्हापासून उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय जगदीश पांडे कारंजा यांच्याकडे पदभार होता कोणताही भेदभाव न करता जनसामान्यांना न्याय देण्याचे काम पांडे यांनी केले. कारंजा लाड व मंगरूळपीर तालुक्यात भल्या भल्यांना वाटणीवर आणले दोन नंबर वाल्यांचा तर गाशाच गुंडाळून ठेवला होता.
मंगरूळपीर उपविभागाला हक्काचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. आपल्या मेट्रो सिटी तील सिनीअर पोलीस निरीक्षक पदावरून प्रमोशन वर उपविभागीय पोलीस अधिकारी पदापर्यंत चा दांडगा अनुभवाचा उपविभागात कायदा व सुव्यवस्था राबविण्यासाठी फायदा होईल. एक कडक महीला एस डी पी ओ म्हणून त्यांची छाप असेल ? कर्तव्यदक्ष जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आपले कार्य मोलाचे ठरेल शहरात अनेक ठिकाणी दिवसा चोऱ्या झाल्या त्याचा अद्याप पर्यंत सुगावा लागला नाही जनसामान्यांचे लक्ष आपण निश्चितच न्याय द्याल अशी चर्चा मात्र सर्वत्र रंगली आहे . मंगरूळपीर उपविभागीय पोलीस अधिकारी पदी निलीमा आरज यांना शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले.
0 Comments