Ticker

6/recent/ticker-posts

समाजसेविका अश्विनी अवताडे यांचा स्तुत्य उपक्रमजिव्हाळा फाउंडेशनचे एक पाऊल पुढे


मंगरुळपीर दि 3
मंगरुळपिर शहरातील बस स्थानक परिसरामध्ये अश्विनी अवताडे यांच्या नेतृत्वाखाली दि 3 रोजी पालावरील मुलाच्या  शैक्षणिक समस्या व महिलांचे आरोग्य याबाबत जनजागृती व  यावरील  उपाय योजना हा कार्यक्रम पार पडला आहे
पाला वरील मुलांच्या शिक्षण व  महिलांचे आरोग्य हा आगळावेगळा उपक्रम गेली दोन  वर्षापासून सुरू केला असून.या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे 
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री राजूभाऊ अवताडे, अध्यक्ष, चित्रकथी समाज संघर्ष समिती तथा महाराष्ट्र भटक्या जमाती संघर्ष समिती यांच्या हस्ते मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली. कार्यक्रमाचे संचालन श्री सुबोधभाऊ वंजारे यांनी केले. प्रमुख अतिथी श्री इंगोले साहेब, श्री विठ्ठलराव अवताडे रा. कारंजा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले की नाथजोगी भराडी समाजाच्या आणि इतर भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षित करण्याकरिता शाळेमध्ये प्रवेश देणे त्यांना मोफत वस्तीगृह उपलब्ध करून देणे आणि महिलांना, तरुणांना छोटे उद्योग  धंद्याची सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर भटकंती करणाऱ्या भटक्या जमातीने उद्योग धंदे करून एका ठिकाणी स्थायिक व्हावे. भटकंती करणे आणि भीक्षा मागने बंद करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये कसे आणता येईल यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यानंतर सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करून भटक्या जमातीच्या लोकांना संविधानिक दृष्ट्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याकरिता सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन सहकार्य करावे असे आयोजकांनी सर्वांना आवाहन केले आहे.
जिव्हाळा फाउंडेशन अंतर्गत      भटक्या व विमुक्त जमाती पुर्वीपासून एका गावातुन दुसऱ्या गावात भटकत असतात.त्यामुळे ते त्यांच्या हक्क अधिकारापासून आजही वंचित आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी , विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी, पालावरील आई वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी, पालावरील महिलांना आरोग्य विषयक समस्या , बालविवाह, जेष्ठ नागरिक, स्वयंरोजगार, महिलांना लघु उद्योग, शैक्षणिक कागदपत्रे काढतांना येणाऱ्या अडचणी तसेच  त्यांना पालमुक्त करून हक्काचे घर देण्यासाठी , त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी..
या उपक्रमाची सुरुवात जिव्हाळा फाउंडेशन च्या अंतर्गत होत आहे.
मुलांना शिकवण्याचं काम अरे शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा काम करत आहे पण तिथे गेल्यानंतर मला महिलांच्या वेगवेगळ्या समस्या माहित पडल्या बालविवाह महिलांचे आरोग्य, मुलीं शिक्षणापासून वंचित महिलांना रोजगार नाही त्यामुळे  त्यांचा आयुष्य पिढ्या पिढ्यांना असच चालू आहे त्यामुळे यामध्ये परिवर्तन घडवून आणणे निंतात गरजेचे आहे

Post a Comment

0 Comments