वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
वाशिम - शासन आपल्या दारी, या संकल्पने अंतर्गत नगर परिषदेच्या विविध विभागांच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे उद्गार आमदार लखन मलीक यांनी २ जुलै २०२३ रोजी टिळक स्मारक मध्ये आयोजित शासन आपल्या दारी, या शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रम प्रसंगी केले.
कार्यक्रमात माजी आमदार अॅड. विजयराव जाधव, पुरुषोत्तम राजगुरु, शिवसेना जिल्हाप्रमुख विजयराव खानझोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे, दिलीप जोशी, शहर शिवसेना प्रमुख श्याम दुरतकर, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, शिवसेना जिल्हा उपप्रमुख भागवत सावके, महिला जिल्हाप्रमुख वैशालीताई येळणे, महिला शहरप्रमुख शुभांगी ठाकरे, युवासेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे, सामाजिक कार्यकर्त रफिक खान, उद्योजक अनिल केंदळे, भाजपा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे, तालुकाप्रमुख प्रकाश महाल्ले, संतोष बळी, दिपक भालेराव, दिलीप बरेटिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यामध्ये नगर परिषद वाशिमच्या वतीने विविध योजने अंतर्गत तमन्ना महिला बचतगट यांना १० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. साईराम महिला बचतगट यांना ९.५० लाख रुपये मंजूर करण्यात आले. साथिया महिला बचतगट यांना २ लक्ष रुपये पल्लवी महिला बचतगट यांना ६ लक्ष रुपये, गणेश महिला बचतगट यांना १ लक्ष रुपये, मुलनिवास पुरुष अपंग बचतगट यांना ५ लक्ष रुपये, जिजाऊ महिला बचतगट, ओम नमः शिवाय महिला बचतगट यांना परावर्तित निधी खेळते भागभांडवल म्हणून १० हजार रुपयेचे पत्र देण्यात आले.
उत्तर प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत वैशाली राऊत १० हजार रुपये, अनिता राऊत १० हजार रुपये, साहेबराव कांबळे २० हजार रुपये, उज्वला संतोष राऊत यांना १० हजार रुपये, त्याचप्रमाणे एनयूएलएम या विभागाकडून परिचय बोर्ड म्हणून कणेवार तसेच उध्दव मडके यांना प्रदान करण्यात आले.
पंतप्रधान आवास योजनांतर्गत ऑनलाईन पध्दतीने बँक खात्यामध्ये प्रथम हप्ता अनुदान वितरण यादी देण्यात आली. त्यामध्ये शेख गुलाब शेख रहीम. सुधाकर शंकरसा परळकर, शंकर बाबाराव जावळे, सखाराम सहदेव श्रीवास, अच्चूल आरेफ अब्दुल रहेमान शेख, ज्योती राजु इंगोले यांना केंद्र शासनाचे ६० हजार व राज्य शासनाचे ४० हजार अशे एक लक्ष रुपये प्रथम हप्ता म्हणून अनुदान देण्याबाबत बँकमध्ये नोंदविण्यात आलेले आहे.
याचप्रमाणे जन्म-मृत्यू नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे, दिव्यांग व्यक्तिंना वार्षिक अर्थसहाय्य मिळण्याकरीता लागणारी कागदपत्रे, अग्नीशमन विभागाकडून तात्पुरते अग्नीशमन प्रमाणपत्र तसेच नुतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणीकरीता लागणारी आवश्यक कागदपत्रे, मालमत्ता करासाठी हस्तांतरण नोंद, फेरफारसाठी लागणारी कागदपत्रे या व इतर अनेक नगर परिषद अंतर्गत असलेल्या योजनांकरीता शासन आपल्या दारी, या संकल्पने अंतर्गत नगर परिषदेच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे. तो त्यांनी घेण्याचे करावे, असे कळकळीचे आवाहन मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास नागरिकांची प्रचंड प्रमाणात उपस्थितीथी होती.

0 Comments