Ticker

6/recent/ticker-posts

सत्तेतून बाहेर पडणार शिंदे गट? अंतर्गत हालचालींना वेग

 अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आहे. कोणता खरा राष्ट्रवादी पक्ष? हा प्रश्न सध्या जनतेच्या मनात आहे. सरकारमध्ये विद्यमान परिस्थितीत तीन पक्ष सहभागी आहेत. त्यामुळे एका पक्षाची नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर बंडखोर नेत्यांनी पक्ष संपत असल्याचं विधान केलं होतं. अजित पवार निधी देत नव्हते, ते पक्ष संपवत होते आणि राष्ट्रवादी वाढवत होते, असा ठपका ठेवण्यात आलेला होता. तर आता ज्या पक्षामुळे बंड केलं त्याच पक्षासोबत महायुती केल्यामुळे शिवसेनेत नाराजी दिसून येत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार व पक्षातील नेत्यांवर दबाव वाढला आहे. सरकारमध्ये अजित पवार व इतर सहकार्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. याबाबत काही नेत्यांनी बोलताना याबद्दल माहीती नसल्याचं सांगितलं. तर अजित पवार यांच्या सरकारमधील सहभागाबाबत कुणालाच विश्वासात न घेतल्यामुळे आमदारांमध्ये नाराजीचे सुर दिसून आले.(Latest Marathi News)तर शिवसेना-भाजप यांच्या युतीला 1 वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात मंत्रीमंडळाचा विस्तार न करता, अजित पवारांच्या पक्ष प्रवेशानंतर विस्तार करून त्यातही स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील इच्छुक आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.अजित पवार आणि इतर नेत्यांच्या शपथविधी नंतर शिवसेनेचे सरकारमधील महत्व संपवले जात असल्याची कुजबूज शिवसेनेच्या आमदारांमध्ये, सुरू आहे. राष्ट्रवादी विशेष म्हणजे अजित पवार यांचे कारण देऊनच पक्षात बंड करत वेगळी चूल मांडली. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे कसे यासारख्या प्रश्नांमुळे आमदारांची गोची झाली आहे. 
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार व पक्षातील नेत्यांवर दबाव वाढला आहे. सरकारमध्ये अजित पवार व इतर सहकार्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. याबाबत काही नेत्यांनी बोलताना याबद्दल माहीती नसल्याचं सांगितलं. तर अजित पवार यांच्या सरकारमधील सहभागाबाबत कुणालाच विश्वासात न घेतल्यामुळे आमदारांमध्ये नाराजीचे सुर दिसून आले.(Latest Marathi News)तर शिवसेना-भाजप यांच्या युतीला 1 वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात मंत्रीमंडळाचा विस्तार न करता, अजित पवारांच्या पक्ष प्रवेशानंतर विस्तार करून त्यातही स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील इच्छुक आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.अजित पवार आणि इतर नेत्यांच्या शपथविधी नंतर शिवसेनेचे सरकारमधील महत्व संपवले जात असल्याची कुजबूज शिवसेनेच्या आमदारांमध्ये, सुरू आहे. राष्ट्रवादी विशेष म्हणजे अजित पवार यांचे कारण देऊनच पक्षात बंड करत वेगळी चूल मांडली. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे कसे यासारख्या प्रश्नांमुळे आमदारांची गोची झाली आहे.
बदललेली राजकिय परिस्थिती, आमदारांमधील अस्वस्थता आणि नवी समिकरणे बसण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शिवसेना मंत्री, आमदार, आणि खासदार यांची आज बैठक बोलवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपुरातून तातडीने मु्ंबईला रवाना झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी राजशिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपतींचे स्वागत केले. राष्ट्रपतींना राजभवनात त्यांनी सोडले. त्यानंतर मुख्यमंत्री तातडीने मुंबईच्या दिशेने निघाले. शिंदे गटाची बैठकमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी 7 वाजता सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, पक्षाची भूमिका आदी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments