Ticker

6/recent/ticker-posts

गुरुमाऊली श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या दर्शनार्थ भिडे गुरुजीचे होणार आगमन.

 कारंजा लाड  प्रतिनिधी संजय कडोळे

 : करोडो देशवासी हिंदु समाजामध्ये लोकप्रिय असलेले आणि प्रखर हिंदुत्ववादी म्हणून आजच्या काळात ओळखले जाणारे एकमेवाद्वितीय गुरुवर्य,भिडे गुरुजी उपाख्य गुरुवर्य संभाजीराव भिडे यांचे उद्या,रविवारी दि. 30 जुलै रोजी,सकाळी दहा वाजता, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वत्सगुल्म वाशिम विभागाच्या वतीने,स्थळ : काळे लॉन वाशीम,आर.ए. कॉलेज रोड,अकोला नाका वाशिम येथे "हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिहासन खडा पहारा." या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात त्यांचे शनिवार दि 29 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता आगमन होणार असून,जिल्ह्यात प्रवेश करतांना सर्वप्रथम भिडे गुरुजी कारंजा शहरात,श्री गुरुमंदिर कारंजा येथे,दत्तावतार गुरुमाऊली श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या दर्शनार्थ येणार असून,श्री गुरुमंदिर संस्थान कारंजा यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार होणार आहे.कारंजा येथे शक्य तेवढया लवकरच दर्शन आटोपून लगेच वाशिमकडे रवाना होणार असल्याचे वृत्त, मिळाले असून,उद्या होणाऱ्या वाशिम येथील व्याख्यानात ते काय बोलणार ? याची उत्सुकता जिल्हयातील त्यांच्या चाहत्यांना लागलेली असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments